esakal | अंड्यापासून नव्हे तर आलूपासून तयार करा आमलेट
sakal

बोलून बातमी शोधा

Make omelette not from eggs but from potatoes

आज आम्ही तुम्हाला अंड्यातून तयार केलेल्या आमलेटबद्दल नाही तर बटाटेपासून तयार केलेल्या आमलेटविषयी सांगणार आहोत. हे आमलेट अंड्यांपेक्षा कितीतरी पटीने चवदार होईल.

अंड्यापासून नव्हे तर आलूपासून तयार करा आमलेट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : अनेकांना नॉनव्हेज खायला आवडते तर अनेकांना फक्त अंडी खायला आवडते. ज्यांना अंडेच आवडतात ते भाजी, भुर्जी व आमलेट तयार करून खातात. मात्र, आम्ही आमलेटप्रेमींसाठी एक नवीन रेसिपी घेऊ आलो आहे. तुम्ही आलूपासून आमलेट तयार करू शकता. ते कस हे आपण आज शिकणार आहो.

आज आम्ही तुम्हाला अंड्यातून तयार केलेल्या आमलेटबद्दल नाही तर बटाटेपासून तयार केलेल्या आमलेटविषयी सांगणार आहोत. हे आमलेट अंड्यांपेक्षा कितीतरी पटीने चवदार होईल. हे लहान मुलांपासून आवडेल. बटाटापासून तयार केलेले हे आमलेट तुम्ही घरी अगदी थोड्या वेळात बनवू शकता. आपल्याला ते तयार करण्यासाठी खूप मेहनत करण्याची आवश्यकता नाही. चला तर जाणून घेऊया रेसिपीबद्दल...

लागणारी मुख्य सामग्री

चार उकळलेले आलू, अर्धा चम्मच अद्रक पेस्ट, अर्धा चम्मच लसूण पेस्ट, चिरलेला कांदा, अर्धा कप दूध, अर्धा चम्मच काळी मिरी पावडर, एक कप तेल, मीठ, अर्धा वाटी हरभरा पीठ व अर्धा चम्मच बेकिंग सोडा

अस करा तयार

सर्वात अगोदर बटाटे सोलून हलके चुरा आणि भांड्यात ठेवा. दुसऱ्या भांड्यात पाणी व हरभरा पीठ टाकून एकत्र करा. चांगल्याप्रकारे मिक्स झाल्यानंतर चिरलेले बटाटे इतर पदार्थांसह घाला आणि चांगले मिसळा. आता कढईत तेल गरम करून आले-लसूण पेस्ट घाला आणि थोडावेळ शिजवा. आले-लसूणचे पेस्ट शिजल्यानंतर त्यावर तयार बटाट्याचे मिश्रण घाला आणि ते आमलेटच्या आकारात पसरवा आणि थोडावेळ शिजवा. थोड्या वेळाने दुसरी बाजू देखील पलटवा आणि चांगले शिजवा. थोड्या वेळाने प्लेट मध्ये घ्या आणि खायला द्या.

loading image