esakal | घरी बनवा 'नूडल्स पफ', बच्चेकंपनी आवडीने मारतील ताव
sakal

बोलून बातमी शोधा

नूडल्स पफ

घरी बनवा 'नूडल्स पफ', बच्चेकंपनी आवडीने मारतील ताव

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद - नूडल्सचे नाव ऐकताच लहान मुलांच्या तोंडाला पाणी येते. कोणीही घरात नूडल्स बनवत असेल तर ती केव्हा खायला मिळेल याची वाट पाहत बसतात. असे असताना तुम्ही हटके अशा नूडल्स रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करु शकता. ते म्हणजे नूडल्स पफ. नूडल्स आट्यात भरुन बनवले जाते आणि क्रिस्पी होईपर्यंत ते तळले जाते. नूडल्स पफ बच्चे कंपनीला नक्की आवडेल, तर चला रेसिपीविषयी जाणून घेऊ या...

बनवण्याची पद्धत

- नूडल्स पफ बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शिमला मिरची, कांदा बारीक कापावा लागेल. दुसरीकडे भांड्यात मैदा, आटा आणि पाणी एकत्र करुन आटा मळून घ्या आणि काही वेळेसाठी बाजूला ठेवून द्या.

- त्यानंतर एका पॅनमध्ये पाणी, मॅगी, शिमला मिरची, टोमॅटो आदी टाकून नूडल्स टाकून तयार करुन घ्या आणि थंड होण्यासाठी काही वेळ ठेवा.

- आट्यापासून पुरी तयार करा. ती झाल्यानंतर त्यात दोन चमचे नूडल्स मधोमध भरा आणि तिचे कोन बंद करा.

- त्यानंतर पॅनमध्ये तेल चांगले गरम करा. त्यात तयार पफ टाकून चांगल्या प्रकारे तळून घ्या. तळ्यानंतर प्लेटमध्ये ती काढून घ्या. त्यातील तेल निघून गेल्यानंतर नूडल्य पफ साॅस बरोबर खायला तयार.

साहित्य

- नूडल्य

- टोमॅटो - १

- मैदा एक कप

- शिमला मिरची १/२ बारीक कापलेली.

- कांदा १/२ बारीक कापलेला

- मिठ चवीनुसार

- साॅस १/२ चमचे

- मॅगी मसाला - १ चमचा

- तेल गरजेनुसार

कृती

- सर्वप्रथम मैद्यात थोडेसे मीठ आणि पाणी टाकून चांगल्या प्रकारे मळून घ्या.

- नंतर एका पॅनमध्ये पाणी गरम करुन मॅगी, शिमला मिरची, कांदा आदी टाकून नूडल्स बनवून घ्या.

- आता आट्याच्या पुरी बनवा. त्यानंतर तिच्या मधोमध मॅगी भरा आणि तिचे कडे थोडेसे पाणी लावून बंद करा.

- त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि नूडल्य पफ चांगल्या प्रकारे तळून घ्या. तुमचे नूडल्स पफ साॅस बरोबर खायला तयार.

loading image