
Raveena Tandon diet: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन तिच्या फिटनेसमुळे नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असते. ती 52 व्या वर्षीही ग्लॅमरस आणि तंदुरूस्त दिसते. रवीना टंडन ९० च्या दशकापासून रूपेरी पदड्यावर काम करत आहे. ती आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करते. कारण रवीना टंडनच्या सौंदर्यामागील रहस्यही खास आहे.
तिने एका मुलाखतीत सांगितले की ती शुटिंगवर गेल्यावर नाश्त्यात मखाना खायची. तिला नाश्त्यात पौष्टिक पदार्थच खायला आवडतात. तसेच पुढे ती म्हणाली की आजसुद्धा सुनिल शेट्टी, संजू विचारतात की अजुनही मखाना खातेस?
मखाना हे आता खुप ट्रेंडला आले आहे. तसेच मखाना एक सुपरफुड आहे. मखाना खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. मखान्यामध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम यासारखे अनेक पोषक घटक असतात जे अनेक आजार दूर ठेवतात तसेच वजन कमी करण्यास मदत करते. चला तर मग जाणून घेऊया चवदार मखाना पॉपकॉर्न बनवण्यासाठी साहित्य काय लागते आणि कृती काय आहे.