

Morning Breakfast Recipe:
Sakal
थंडीच्या दिवसात शरीराला उबदार ठेवणारे आणि पचायला हलके असे काहीतरी खाण्याची इच्छा होते. अशा वेळी सकाळच्या नाश्त्यात पटकन तयार होणारे ब्रोकोली सूप हा एक उत्तम पर्याय आहे. ब्रोकोलीमध्ये फायबर, व्हिटॅमिन C, K, अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. थंडीमध्ये सर्दी-खोकल्यापासून संरक्षण देण्यासाठी गरमागरम सूपपेक्षा चांगले दुसरे काहीच नाही. हे सूप बनवायला वेळ कमी लागतो, साहित्यही अगदी साधे आणि घरातच उपलब्ध असते. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरणारे हे हेल्दी सूप सकाळचा हलका पण पौष्टिक नाश्ता पूर्ण करते. ब्रोकोली सुप बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.