
How to make quick paneer veg kebab for breakfast: सोमवारची सकाळ खास आणि चवदार बनवण्यासाठी पनीर आणि व्हेजी कबाब ही एक उत्तम रेसिपी आहे. हा पौष्टिक आणि स्वादिष्ट नाश्ता तुमच्या दिवसाची सुरुवात ऊर्जेने करेल. पनीरच्या मऊपणासोबत विविध भाज्यांचे पोषक तत्त्व आणि मसाल्यांचा तिखट सुगंध यामुळे हे कबाब सर्वांना आवडतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या चविष्ट पदार्थाचा आनंद घेऊ शकतो. विशेष म्हणजे, ही रेसिपी तयार करणे अत्यंत सोपे आणि कमी वेळत तयार होणारी आहे, ज्यामुळे सकाळीही तुम्ही झटपट नाश्ता बनवू शकता.
पनीर प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे तर भाज्या जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतात. हे कबाब तळण्याऐवजी बेक किंवा शॅलो फ्राय केल्यास अधिक आरोग्यदायी पर्याय मिळतो. सोमवारी नाश्त्यासाठी काहीतरी नवीन आणि लज्जतदार ट्राय करायचं असेल, तर ही रेसिपी नक्कीच तुमच्या आवडीची ठरेल. चला, जाणून घेऊया पनीर व्हेजी कबाब बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.