esakal | माझी पाककृती : नाचणीच्या पिठाचे धिरडे । Recipe
sakal

बोलून बातमी शोधा

माझी पाककृती : नाचणीच्या पिठाचे धिरडे

माझी पाककृती : नाचणीच्या पिठाचे धिरडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मृणालिनी जमदग्नी, सातारा

साहित्य : २ वाट्या नाचणीचे पीठ, २ चमचे आले-लसूण मिरची पेस्ट, १ चमचा धने-जिरेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, २ चमचे तेल, चवीपुरते मीठ, कोथिंबीर

कृती :

  • नाचणी स्वच्छ निवडून गिरणीतून दळून आणावी, त्या पिठात बिब्बे घालून ठेवावेत म्हणजे पिठात अळी-जाळी होत नाही व कीड लागत नाही.

  • पिठात वर दिलेले सर्व साहित्य मिसळावे व सरसरीत पीठ भिजवावे.

  • बिडाच्या तव्याला ब्रशने तेल पसरून लावावे व त्यावर धिरडे घालावे.

  • शक्यतो बिडाचा तवा वापरावा, त्यामुळे चव खमंग येते.

  • हे धिरडे टोमॅटो सॉस किंवा नारळाची चटणी यांच्याबरोबर सर्व्ह करावे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, त्यामुळे गरोदर स्त्रिया, वाढत्या वयाची मुले, ज्येष्ठ नागरिक यांनी आहारात नाचणीचा वापर करावा. हे धिरडे आरोग्यदायी नाश्ता आहे.

खाने मे ‘ट्विस्ट’

विशिष्ट पदार्थ आपण नेहमीच करतो; पण त्याला काही नवीन ट्विस्ट देण्याचेही प्रयोग अनेक जण करत असतात. मोदकाच्या आत वेगळं सारण घालणं असो, पिझ्झा पोषणयुक्त करण्यासाठी ‘स्टफिंग’मध्ये बदल करणं असो, किंवा अगदी फोडणी करतानाच्या पद्धतीत काही बदल असोत. तुम्ही असा काही ‘ट्विस्ट’ दिला असेल, तर त्या पदार्थाची रेसिपी आणि त्याबाबतचे कानमंत्र आणि काही सूचना असेल तर ती आम्हाला जरूर पाठवा. तुम्ही ‘ट्विस्ट’ दिलेल्या रेसिपीचा फोटो असेल तर उत्तम. हा ‘ट्विस्ट’ का दिला आणि त्यामुळे काय साध्य झालं हे मात्र जरूर सांगा, ज्यामुळे इतरांनाही काही प्रेरणा मिळेल. चला तर मग, लिहायला करा सुरुवात आणि पाठवा sugaran@esakal.com वर.

loading image
go to top