माझी रेसिपी : वांग्याचे भरीत आणि कळण्याची पुरी

चित्रा पाठक, पुणे
Friday, 24 January 2020

साहित्य - कळणा म्हणजे १ किलो ज्वारी आणि पाव किलो काळी उडीद डाळ दळून आणावी. भरितासाठी वांगे, लसूण, कांद्याची पात, मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे.

साहित्य - कळणा म्हणजे १ किलो ज्वारी आणि पाव किलो काळी उडीद डाळ दळून आणावी. भरितासाठी वांगे, लसूण, कांद्याची पात, मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे.

कृती - प्रथम वांगे चांगले भाजून घ्यावे. नंतर ते सोलून ठेचून घ्यावे. कांद्याची पात बारीक चिरून घ्यावी. त्यात आवडीप्रमाणे मिरची तव्यावर भाजून घालावी. लसूण, मिरची आणि थोडी कांद्याची पात मिक्सरमध्ये बारीक करावी किंवा ठेचून घ्यावी. भांड्यात तेल, मोहरी, मिरची, कांद्याच्या पातेचा ठेचा चांगला परतून घ्यावा. त्यात ठेचलेले वांगे, मीठ, कोथिंबीर टाकून छान परतून घ्यावे. पुरीसाठी कळण्याच्या पिठात थोडे (दोन चमचे) कणीक व थोडे मीठ टाकून घट्ट भिजवावे. छान गरमागरम पुऱ्या तळून वाढव्यात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: my recipe