
एक वाटी गव्हाचा दलिया, अर्धी वाटी चिरलेल्या भाज्या, गाजर, मटार, टोमॅटो, ओल्या मक्याचे दाणे, कांदा एक, हिरवी मिरची एक, थोडे मीठ, थोडी साखर, एक ते दीड वाटी पाणी, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग.
साहित्य - एक वाटी गव्हाचा दलिया, अर्धी वाटी चिरलेल्या भाज्या, गाजर, मटार, टोमॅटो, ओल्या मक्याचे दाणे, कांदा एक, हिरवी मिरची एक, थोडे मीठ, थोडी साखर, एक ते दीड वाटी पाणी, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कृती - प्रथम दलिया कढईत भाजून एक ते दीड वाटी पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवून घेणे. नंतर कढईत एक डाव तेल टाकून फोडणी करणे. त्यात कांदा घालून परतणे. एका हिरवी मिरचीचे तुकडे घालणे. त्यात भाज्या घालून चांगल्या वाफवून घ्यावात. त्यात शिजलेला दलिया टाकून परत वाफवून घेणे. अर्धे लिंबू पिळणे. मीठ व साखर घालणे. चांगले हलवून घ्यावे. वरून खोबरे, कोथिंबीर घालून सजविणे. पौष्टिक उपमा तयार.
Edited By - Prashant Patil