
साहित्य - पुदिना एक जुडी, साखर दोन वाटी, पाणी एक वाटी, काळे मीठ पाव चमचा, दोन लिंबांचा रस, खाण्याचा हिरवा रंग चिमूटभर.
साहित्य - पुदिना एक जुडी, साखर दोन वाटी, पाणी एक वाटी, काळे मीठ पाव चमचा, दोन लिंबांचा रस, खाण्याचा हिरवा रंग चिमूटभर.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कृती - प्रथम पुदिन्याची पाने स्वच्छ निवडून मिठाच्या पाण्यात धुण्यासाठी टाकावी. नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. गॅसवर पातेल्यात साखर, पाणी टाकून एकतारी पाक तयार करून घ्यावा. या पाकात निवडलेली पुदिन्याची पाने रात्रभर भिजत ठेवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी ही पाने निचरून काढावीत. या पाकामध्ये पाव चमचा मीठ व लिंबाचा रस मिक्स करावा.
चांगल्या पद्धतीने ढवळून घ्यावे, नंतर गाळून एका बरणीत भरावे व त्यामध्ये चिमूटभर खाण्याचा रंग (आपल्या आवडीनुसार) टाकावा. काचेच्या बरणीत फ्रिजमध्ये हे सरबत प्रिमिक्स ठेवल्यास अगदी वर्षभरही टिकते. सरबत करण्यासाठी दोन ते तीन चमचे हा रस घ्यावा व त्यामध्ये अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकावे किंवा आपल्या चवीप्रमाणे आपण कमीजास्त करू शकता.
Edited By - Prashant Patil