esakal | माझी पाककृती ; नारळाच्या पोळ्या
sakal

बोलून बातमी शोधा

food

माझी पाककृती ; नारळाच्या पोळ्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- माधुरी पाटणकर, पुणे

नारळाच्या पोळ्या :

साहित्य : १ नारळ, २ वाट्या बेसन, २ वाट्या साखर, २ चमचे वेलदोडा पूड, कणीक, तांदूळ पीठ.

कृती: प्रथम नारळ खरवडून घ्या, खोबरे वाटीने मोजून घ्या.प्रथम २ वाट्या बेसन, बेसन भिजेल एवढे तेल घालून लालसर भाजा.थोडे भाजून झाल्यावर खरवडलेला नारळ घालून परतावे सारण मोकळे झाले, की त्यात २ वाट्या साखर घालून वेलदोडा पूड घालून गॅस बंद करा कणकेत तेल, मीठ घालून मळून घ्यावी.

सारण थंड झाल्यावर पोळ्या कराव्या.सारण खूप मोकळे वाटले, तर दुधाचा हात लावा.सगळ्या सारणात एकदम दूध घालू नये.कणकेची पारी घेऊन पुरणाप्रमाणे उंडा करून पिठी लावून पोळ्या कराव्या, पोळी थोडेसे तेल सोडून भाजावी, पेपरवर ठेवून थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवाव्यात.तुपाबरोबर खमंग, खुसखुशीत पोळ्या खाव्या.या पोळ्या आठवडाभर टिकतात, प्रवासात न्यायला उपयोगी पडतात.

loading image
go to top