esakal | Food : नाचणी चॉकलेट कुकीज
sakal

बोलून बातमी शोधा

choklet cookies

Food : नाचणी चॉकलेट कुकीज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साहित्य :

दीड कप नाचणी पीठ, २ टेबलस्पून गव्हाचं पीठ, अर्धा कप कॉर्नफ्लोअर, पाव कप मिल्क पावडर, दीड कप पिठीसाखर, पाव कप कोको पावडर, १ टीस्पून इन्स्टंट कॉफी, १ टीस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून सोडा, पाऊण वाटी वितळवून थंड केलेलं तूप, २ टीस्पून व्हॅनिला इसेन्स, २ टेबलस्पून थंड दूध.

कृती :

  • नाचणी, गहू पीठ, कॉर्नफ्लोअर, मिल्क पावडर, पिठीसाखर, कोको, कॉफी, बेकिंग पावडर, खायचा सोडा सर्व एकत्र करून ३ वेळा चाळून घ्या.

  • त्यात तूप, व्हॅनिला इसेन्स, दूध घालून व्यवस्थित मळून घ्या. हे पीठ १० मिनिटं झाकून ठेवा.

  • तोपर्यंत ओव्हन १७० डिग्रीवर ७ मिनिटं गरम करून घ्या.

  • कुकीजची कणिक गरज वाटल्यास चमचाभर तूप किंवा दूध घालून मळून घ्या.

  • त्याचे लहान गोळे तयार करून बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. आवडत असल्यास त्याचे लहान कॉफी बीन्ससारखे आकार करा.

  • १७० डिग्रीवर २५ ते ३० मिनिटे बेक करावीत.

  • कुकीज केकपेक्षा थोड्या कमी तापमानावर बेक कराव्यात म्हणजे कुकीज कुरकुरीत होतात.

loading image
go to top