फ्युजन किचन : मॅंगो ‘फिरणी’

मोबाईल वाजत होता. हातातली कामं सोडून मी कॉल घेण्यासाठी मोबाईल घेतला आणि कॉलर आयडी बघताच माझा चेहरा आनंदाने फुलला. वर्षभर या कॉलची मी आतुरतेने वाट पाहत होते.
Mango Firani
Mango FiraniSakal
Summary

मोबाईल वाजत होता. हातातली कामं सोडून मी कॉल घेण्यासाठी मोबाईल घेतला आणि कॉलर आयडी बघताच माझा चेहरा आनंदाने फुलला. वर्षभर या कॉलची मी आतुरतेने वाट पाहत होते.

- नीलिमा नितीन, फूड ब्लॉगर

मोबाईल वाजत होता. हातातली कामं सोडून मी कॉल घेण्यासाठी मोबाईल घेतला आणि कॉलर आयडी बघताच माझा चेहरा आनंदाने फुलला. वर्षभर या कॉलची मी आतुरतेने वाट पाहत होते. घरचेही माझा हा अतिआनंदी चेहरा बघून आश्चर्याने बघत होते. मी कॉल उचलला आणि बरंच काही बोलले आणि अधीरतेने शेवटी म्हणाले, ‘लवकर ये.’

मग काय, आनंदानं आणि तितक्याच अधीरतेनं माझी प्रतीक्षा सुरू झाली. शेवटी तो आला. काय सांगू तुम्हाला माझी गत ‘आनंद गगनात माईना’ अशी झाली. आणि काय करू काय नाही असं मला होत होतं. लगेच सगळं घर त्याचं लोभस रूप, त्याच्या अस्तित्वानं व्यापून गेलं. अहो, तो म्हणजे आंबा नावाचं मधुर फळ.

पण शेवटी संस्कार! सरळ खाण्याचा मोह आवरून मी या हंगामातला पहिला हापूस देवासमोर नेऊन ठेवला. बाप्पाला म्हणाले, ‘‘बाप्पा, या मोसमात सगळ्यांना मनसोक्त आंबा खायला मिळू दे. सगळे आंबे स्वादिष्ट निघू देत. गोड असू देत. आणि वजनाची चिंता दूर दूर ठेव.’ मग माझी मलाच लाज वाटली. विचार केला, बाप्पा म्हणेल काय ही एका आंब्याच्या मोबदल्यात किती मागते. देवाला नमस्कार करून पटकन आंब्याच्या पेटीकडे गेले. त्याचं काय करू काय नाही असं झालं होतं. सुरुवात आंब्याच्या फोडीपासून झाली. कितीतरी पदार्थांची योजना मनात आखून ठेवली होती, आणि मी ते सगळं करणार आहे. अक्षय्यतृतीया म्हणजे आमरस तर असणारच; पण आंब्याचं काहीतरी अजून खास बनवूया असा बेत मी मनात आखला.

आंब्याची ‘फिरणी’ केली तर? पण मला नुसती फिरणी करायची नव्हती, तर ती सर्व्ह पण स्टाईलने करायची होती. कारण शेवटी फळांचा राजा आहे ना तो. अगदी क्रीमी, तोंडात विरघळणारी; पण खूप वेळ मनात रेंगाळत राहील अशी ही मॅंगो फिरणी म्हणजेच आंब्याची खीर आहे. फक्त त्याचं प्रेझेंटेशन मी इथं वेगळं केलं आहे. चला तर मग बघूया साहित्य आणि कृती.

साहित्य -

भिजत ठेवलेला सुवासिक तांदूळ बासमती किंवा आंबेमोहोर दोन चमचे, दूध एक लिटर, साखर चार ते सहा चमचे (आवडीनुसार), आंब्याचा घट्ट रस एक वाटी.

टॉपिंगसाठी : व्हिपिंग क्रीम अर्धा ते पाऊण वाटी, चार चमचे आंब्याचा रस आणि थोड्या आंब्याच्या फोडी.

कृती -

  • भिजवलेला तांदूळ मिक्सरमधून बारीक पेस्ट वाटून घ्या.

  • दुधाला उकळी आल्यावर त्यात वरील तांदळाची पेस्ट घालून सतत ढवळत राहावं. जेणेकरून करपलं जाणार नाही.

  • हे मिश्रण थोडंसं घट्ट झाल्यावर साखर घालून मिक्स करावं व थंड होऊ द्यावं.

  • नंतर यात आंब्याचा रस मिक्स करून ही फिरणी चाळणीनं गाळून/ चाळून घ्यावी. म्हणजे आपल्याला अगदी क्रीमी तोंडात विरघळणारी फिरणी मिळेल.

  • व्हिपिंग क्रीम फेटून घ्यावं. ते चांगले फेटल्यानंतर त्यात थोडासा आंब्याचा रस घालावा. वरील फिरणी व व्हिपिंग क्रीम वेगवेगळ्या पायपिंग बॅगमध्ये भरावेत. सर्व्हिंग ग्लासमध्ये प्रथम फिरणी घालावी. त्यावर व्हिपिंग क्रीम डिझाईन काढावं.

  • थोड्याशा आंब्याच्या फोडी व्हिपिंग क्रीमवरती ठेवून हे थंडगार सर्व्ह करावं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com