Papaya Halwa Recipe: तुम्ही कधी पपईचा शिरा खाल्ला आहे का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Papaya Halwa Recipe: तुम्ही कधी पपईचा शिरा खाल्ला आहे का?

Papaya Halwa Recipe: तुम्ही कधी पपईचा शिरा खाल्ला आहे का?

Cooking Tips : रव्याप्रमाणेच पपईचा देखील शिरा अगदी सहज घरी बनवता येतो. हा शिरा खायला अतिशय चवदार लागतो आणि आपल्या शरिरासाठी देखील उत्तम असतो. चला तर मग आज जाणून घेऊया पपईचा शिरा कसा करायचा याची रेसिपी

Papaya Halwa Recipe : तुम्हाला जर का वजन कमी करायचे असेल किंवा तुम्हाला काही पचनाचा त्रास असेल तर अशा वेळी तज्ञ तुम्हाला भरपूर प्रमाणात पपई खाण्याचा सल्ला देतात. कारण पपई हे अनेक पोषक तत्वांनी युक्त असे फळ आहे. तसेच पपईत कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते. म्हणूनच बहुतेक वेळी लोक हिवाळ्यात पपईचे सेवन करतात, पण तुम्ही कधी पपईपासून तयार केलेला शिरा खाल्ला आहे का?

हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही फक्त रवा गाजरच किंवा बिट याचाच नाही तर पपईचा सुध्दा शिरा तयार करू शकता. पपईचा शिरा रेसिपी अनेक प्रकारच्या पौष्टिकतेने समृद्ध अशी आहे. पपईच्या सेवनामुळे तुमचे हृदय निरोगी राहते तसेच पचन देखील चांगले राहते. चला तर मग आज आपण या लेखात पपईपासून स्वादिष्ट शिरा कसा तयार करायचा याची सविस्तर रेसिपी जाणून घेणार आहोत.

हेही वाचा: Kaju Malpua Recipe: घरच्या घरी भन्नाट लागणारा काजू मालपुआ कसा तयार करायचा?

साहित्य:
● एक मस्त पिकलेली पपई

● दोन चमचे तूप

● अर्धा लिटर उकळलेले दूध

● वेलची पावडर

● साखर अर्धा कप

● सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ता बारीक तुकडे)


कृती:
पपईचा शिरा करणे हा रव्याचा शिरा करण्या इतकाच सोपा आहे. आणग खूप कमी वेळात हा शिरा तयार होतो.पपईचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम पपई सोलून त्याचे छोटे तुकडे करून घ्यावे.आता गॅसवर एक पॅन ठेवावा. त्यात तूप घालून गॅस मंद करावा.तूप गरम झाल्यानंतर पपईचे सगळे तुकडे हळूवार पणे त्या तूपात सोडून द्यावे. आणि दोन ते तिन मिनटे ते तुकडे तूपात चांगले परतून घ्यावे. त्यानंतर गॅस कमी करून त्यात हळूहळू दुध सोडावे. हे दुध आणि पपईचे मिश्रण चांगल एकजीव होईपर्यंत हलवत रहावे.यांच्यानंतर या मिश्रणात साखर सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ता बारीक तुकडे) घालावे.नंतर त्यात वेलची पावडर घ्यालावी आणि हा शिरा मस्त पाच ते सात मिनिटे चांगला शिजू द्यावा. अशा रितीने आपला पपईचा शिरा तयार झालेला आहे.

Web Title: Papaya Halwa Recipe Have You Ever Eaten Papaya Halwa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..