
महाराष्ट्राला मोठी खाद्यपरंपरा लाभली आहे. विविध चवीचे, विविध पद्धतीचे पदार्थ येथे चाखायला मिळतात. अगदी पुरणपोळीपासून ते पावभाजीपर्यंत अनेक पदार्थ महाराष्ट्रात केले जातात. त्यामुळे महाराष्ट्र हा पर्यटन स्थळांसोबतच त्याच्या खाद्यसंस्कृतीसाठीदेखील तितकाच ओळखला जातो. खाद्यसंस्कृतीचा विषय आला की मुंबईचं नाव आवर्जुन घेतलं जातं. मुंबईतील अनेक ठिकाणं ही खासकरुन तेथील फेसम पदार्थांसाठीच ओळखले जातात. यात पावभाजी आणि पाणीपुरी हे मुंबईतील सर्वात लोकप्रिय पदार्थ आहेत. त्यामुळे मुंबईत सर्वोत्तम आणि तितकीच लोकप्रिय असलेली पावभाजीची ठिकाणं कोणती ते पाहुयात. १. गुरुकृपा पावभाजी सेंटर -
घाटकोपर येथे असलेलं गुरुकृपा पावभाजी सेंटर हे मुंबईतील फेमस पावभाजी सेंटरपैकी एक आहे. येथे मिळणारी पावभाजी विशेष लोकप्रिय असून ही पावभाजी खाण्यासाठी अनेक जण लांबून येतात. ही पावभाजी खास पद्धतीने तयार केली जाते. त्यामुळे तिची चव अन्य कोणत्याही ठिकाणी सहज मिळत नाही.
२. व्हेजी -
ठाण्यातील सर्वोत लोकप्रिय आणि प्रसिद्ध खाण्याचं ठिकाण म्हणजे व्हेजी. या हॉटेलमध्ये सगळ्या प्रकारचे पदार्थ मिळतात. मात्र, तेथील पावभाजी ही त्यांची खासियत आहे.
३. श्री सिद्धीविनायक फास्ट फूड -
खरं तर जुहू चौपाटी म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर पाणीपुरी किंवा अन्य चटपटीत पदार्थ येतात. मात्र, या साऱ्या चटपटीत पदार्थांवर जर का कोणी मात करत असेल तर ती श्री सिद्धीविनायक फास्ट फूडची पावभाजी आहे. ही पावभाजी खाण्यासाठी खवैय्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात.
४. संतोष सागर -
मलबार हिलसारख्या उच्चभ्रू ठिकाणी संतोष सागर या हॉटेलमधील पावभाजीदेखील तितकीच लोकप्रिय आहे. ही पावभाजी खाण्यासाठी अनेकदा दिग्गज सेलिब्रेटीदेखील येत असल्याचं म्हटलं जातं.
५. माजी सागर फास्ट फूड -
ताडदेवमधील सर्वात जुनं आणि लोकप्रिय हॉटेल म्हणजे माजी सागर फास्ट फूड. अनेकांच्या मते येथील पावभाजी ही मुंबईत सर्वात बेस्ट पावभाजी आहे.
६. शिवसागर -
शिवसागर या हॉटेलच्या मुंबईत अनेक शाखा आहेत. मात्र, विलेपार्ले येथे असलेल्या हॉटेलमध्ये त्यांची सर्वात उत्तम पावभाजी मिळते. विशेष म्हणजे केवळ पावभाजीच नव्हे तर अन्य अनेक पदार्थांसाठी हे हॉटेल लोकप्रिय आहे.
७. सुखसागर -
जुहू चौपाटीवरील आणखी एक लोकप्रिय पावभाजीचं हॉटेल म्हणजे सुखसागर. संध्याकाळच्या वेळी या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर खवैय्यांची गर्दी पाहायला मिळते.
८. भगवती -
फेमस पावभाजी स्टॉलच्या यादीत जर कांदिवलीच्या भगवती फूडस्टॉलचं नाव जर का घेतलं नाही तर ही यादी पूर्णच होऊ शकत नाही. कांदिवलीमधील भगवती फूडस्टॉलमध्ये अप्रतिम पावभाजी मिळत असून येथे तरुणाईची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते.
९. मारुती पावभाजी -
विलेपार्ले येथील शिवसागर हॉटेलप्रमाणेच मारुती पावभाजी सेंटरवरील पावभाजीदेखील तितकीच लोकप्रिय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.