Pavbhaji History: पावभाजी खूप आवडते? पण हिच्या निर्मितीचा संबंध थेट अमेरिकेशी आहे हे माहिती आहे का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pavbhaji History

Pavbhaji History : पावभाजी खूप आवडते? पण हिच्या निर्मितीचा संबंध थेट अमेरिकेशी आहे हे माहिती आहे का?

साध्या चौपाटीच्या गाडीपासून तर अगदी मोठ्या 5 स्टार हॉटेल्स पर्यंत भारतात सगळीकडे मिळणारी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला प्रचंड आवडणारी अशी डिश म्हणजे पावभाजी. पावभाजी ही मुंबईच जगप्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. छान बटरमध्ये भाजलेले पाव आणि मसालेदार भजीची चव अशी असते की ती खाल्ल्यानंतर आपण बोट चाटत राहतो.

पण तुम्हाला हे माहिती आहे का की जेवढी चविष्ट पावभाजी आहे तेवढाच मसालेदार तिचा इतिहास सुद्धा. विशेष म्हणजे एवढ्या सुंदर डिशचा इतिहास एका युद्धाशी संबंधित आहे.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

अमेरिकेतील सिव्हिल वॉरमुळे (१८६१-१८६५) कापसाची मागणी झपाट्याने वाढू लागली होती. हे युद्ध अमेरिका आणि दक्षिण भागातल्या 11 इतर राज्यांमध्ये झालेल. रिपोर्ट नुसार या चार वर्षात कापूस उत्पादनाच्या बाजपेठेतून दक्षिण अमेरिका बाजूला झाली होती. हे स्टेट्स मुख्यतः कापसाचे उत्पादन करायचे, पण ते बंद झाल्यामुळे जगभरात कापसाची मागणी वाढली.

याचा फायदा घेत इंग्लंड ने जे तेव्हा भारतावर राज्य करत होते मुंबईच्या गिराण्यांना अधिकाधिक कापूस उत्पादन करण्याचा आदेश दिला; परिणामी, मुंबईतील कापड गिरण्यांमध्ये रात्रंदिवस काम सुरू होत. उत्पादन मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी गिरण्यांमध्ये मजुरांना रात्रंदिवस काम करावे लागत होते.

त्यामुळे त्यांच्याकडे जेवायला फारच कमी वेळ होता. त्यामुळे गिरण्यांच्या बाहेरच काही स्टॉल उभे केले गेले; पण हे स्टॉल वरच जेवण स्वस्त पोत भरणार आणि लवकर तयार होणार असावं असा विचार यामागे होता. याचा विचार करून उरलेल्या भाज्यांना टोमॅटो आणि बटाट्याच्या बेसमध्ये मॅश करून आणि काही मसाले टाकून भाजी तयार केली गेली आणि बेकरी मध्ये उरलेल्या पावांना बटर बरोबर भाजून सर्व्ह केल गेल.

हेही वाचा: Canada Permanent Residents : 'ही' 16 कामे करणाऱ्यांना मिळणार कॅनडाचे नागरिकत्व

काही इतिहास तज्ञ पावभाजीचा इतिहास पोर्तुगीज लोकांशी जोडतात; पोर्तुगीज लोकांना अशी सगळ्या भाज्या मिक्स करून पावा सोबत खायची सवय होती असं ते म्हणतात. पोर्तुगीजांनी ब्रिटीशांना आणि त्यांनी आपल्याला ही डिश दिली असावी असं त्यांच म्हणणं आहे.

काहीही असो, यामुळे आपल्याला खूप जास्त चविष्ट अशी एक डिश मिळाली आहे हे मात्र खरं. मुंबईच्या छोट्या छोट्या चौपाटीपासून सुरू होत पुढे महाराष्ट्रभर आणि नंतर संपूर्ण देशात पावभाजीने आपली जागा बनवली आहे. आता देशातील मोठ्या-छोट्या रेस्टॉरंटसोबत 5 स्टार हॉटेल्समध्येही पावभाजीला खूप डिमांड आहे.