आता 10 मिनीटांत नाश्तासाठी बनवा धिरडे ; जाणून घ्या रेसीपी

 बटाट्याचे धिरडे
बटाट्याचे धिरडेGoogle

रोज सकाळी उठल की प्रश्न पडतो आज नाश्ता काय करायचा. रोज पोहे, उप्पीट, इडली, डोसा हे ठरलेले मेनू. बरं घरात प्रत्येकाची आवड वेगळी. लहान मुलांचे तर नखरे वेगळेच. अशा वेळेस अडचणीत येते ती आईचं. नाश्ता हेल्दी पण झाला पाहिजे आणि पोटभर ही. यासाठी तीची धडपड वेगळीच. पण काळजी करू नका अगदी १० मिनीटांत तयार होईल अशी रेसीपी तुम्हाला सांगणार आहोत. ते म्हणजे कच्या बटाट्यापासून तयार होणारे बटाट्याचे धिरडे. (Potato Recipe )यासाठी वेगळं काही आणायची गरज नाही. घरातील आहे त्या वस्तू वापरून तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसीपी.

साहित्य

  • बटाटे : 4

  • गव्हाचे पीठ : 2 वाट्या

  • रवा : 4 चमचे

  • हिरवी मिर्ची : 4

  • लसून : 5 ते 6

  • आद्रक : छोटा तुकडा

  • हिंग, हळद : लहान छोटा चमचा/ चिमुटभर

  • चवीनुसार मीठ

  • कोथंबिर

कृती

सुरवातीला बटाट्याची साल काढून बारीक खिसून घ्या. त्यात गव्हाचे पीठ, रवा, हिरवी मिर्ची, लसून- आद्रक पेस्ट, हळद, हिंग चिमूटभर घाला. त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. तुम्हाला हिरवी मिर्ची आवडत नसेल तर लाल तिखट घालू शकता. आता यात मिठ घालून मिक्स करून घ्या. हे मिश्रण खूप पातळ अथवा घट्ट करू नका. धिरडे कुरकुरीत व्हावे यासाठी यात रव्याचा वापर करावा. तयार झालेल पिठ अर्धा तास भिजत ठेवा. जर खूपच गडबड असेल तर रवा पाण्यात भिजवून पिठात मिक्स करा. आता पॅन गरम करून त्यात तेल किंवा बटर टाकून धिरड्याचे पिठ टाकून त्यावर थोडी कोथंबिर टाकून हळूहळू पसरवून चांगले फ्राय करून घ्या. झाले तुमचे धिरडे तयार. हे तुम्ही दही किंवा साॅस सोबत खाऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com