माझी रेसिपी- झटपट ढोकळा 

प्रमिला रासने 
Saturday, 1 August 2020

काय झटपट बनवता येईल बरं? आता हा प्रश्न सुटेल... वाचा स्वादिष्ट पाककृतींसाठी...

साहित्य - १.५ मध्यम वाटी पाणी, अर्धा चहाचा चमचा सायट्रिक ॲसिड, ६ चमचे साखर, ४ चमचे तेल, चवीनुसार मीठ, २.५ वाटी बेसन, १/४ चमचा खायचा सोडा. 

हेही वाचा - उपवासाचे दहीवडे

कृती - प्रथम एका भांड्यात पाणी आणि सायट्रिक ॲसिड घालावे व त्यानंतर वर सांगितलेले सर्व साहित्य क्रमाने एकावर एक घालून बेसन घालावे. एकसारखे सायट्रिक ॲसिड विरघळेपर्यंत हलवावे. शेवटी खायचा सोडा पाव चमचा घालून पुन्हा हलवावे. एका पसरट मोठ्या कढईत पाणी घालून स्टीलचे स्टॅण्ड ठेवावे. त्यावर एका थाळीला तेल लावून गरम करण्यास ठेवावे. थाळी थोडी गरम झाल्यावर तयार केलेले बेसनचे मिश्रण हलवून वरून ओतावे. कढईवर झाकण ठेवावे म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही. १५ मिनिटांनी ढोकळा खूपच फुलतो. एका पातेल्यात तेल, मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी करावी व त्यात १.५ वाटी पाणी घालावे, ५ चमचे साखर, मिरचीचे अगदी बारीक तुकडे घालावेत. थोडा वेळ उकळी आल्यावर गॅस बंद करावा. ढोकळा झाल्यावर खाली काढून हव्या त्या आकारात कापावा. वरील फोडणी गरम ढोकळ्यावर मधील रेषांमध्ये व कडेला ओतावी. ५ मिनिटातच साखरेचे पाणी जिरून ढोकळा छान फुगून येईल. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. यासोबत कोथिंबीर, मिरची, पुदिन्याची हिरवी चटणी करून लिंबू पिळावे. चटणीसह ढोकळा सर्व्ह करावा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pramila Rasne article about Instant Dhokla Recipe

Tags
टॉपिकस
Topic Tags: