

High-Protein Bottle Gourd and Chana Dal Paratha Recipe for Weight Loss
sakal
High Protein Indian Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काहीतरी पौष्टिक आणि पोटभर खायचं असेल, पण त्याचवेळी चवीलाही तडजोड नको असेल तर दुधी-चणा डाळ पराठा एकदम परफेक्ट पर्याय ठरू शकतो. दुधी भोपळा अनेकांना आवडत नाही, पण त्याच वेळी त्याच्यापासून असा टेस्टी पराठा तयार होतो की घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. प्रोटीन, फायबर आणि पोषक घटकांनी भरलेला हा पराठा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत करतो. शिवाय दही किंवा चटणीसोबत खाल्ला तर त्याची चव अजून वाढते.