
जून काही डाएट सुरु करायचा मूड नाही आणि दिवाळी सुट्टी मधून पण बाहेर यायचा मूड नाही. मग आता काय करायचे ?? मग जे खातोय ते जरा पौष्टिक कसे करता येईल असा विचार करता करता केक खायची इच्छा झाली.
चला दिवाळी तर छान झाली एकदम फराळ गोडाधोडाचे जेवण झाले, नट्टा पट्टा देखील झाला. पण आज सकाळी सकाळी एक गोष्ट मात्र लक्षात आली की सकाळी वजन कट्टयावर उभी राहिले तर दिवाळी मध्ये जशी मज्जा अली तशीच वजनाची देखील मज्जा झाली आहे. पण, अजून काही डाएट सुरु करायचा मूड नाही आणि दिवाळी सुट्टी मधून पण बाहेर यायचा मूड नाही. मग आता काय करायचे ?? मग जे खातोय ते जरा पौष्टिक कसे करता येईल असा विचार करता करता केक खायची इच्छा झाली. अरे देवा आता त्यात आला मैदा ???आता म्हणले मी पौष्टिक खाऊ आणि वजन कमी करू आणि लगेच केक खायची इच्छा झालीये. मला एक आयडिया सुचली आहे आपण मैद्याचा केक न करता आपण नाचणीचा केक करूयात;
रागी / नाचणी एग्ग्लेस केक
साहित्य :
नाचणी पीठ १ वाटी
रवा १/४ वाटी
सुकामेवा(काजू,बदाम,मनुका) १/८ वाटी
दही १/२ वाटी
बिया काढलेले खजूर ३/४ वाटी
कोमट दूध ३/४ वाटी
गायीचे तूप किंवा लोणी १/४ वाटी
बेकिंग पावडर ३/४ tsp
बेकिंग सोडा १/२ tsp
व्हॅनिला इसेन्स १ tsp
मीठ चिमूटभर
गुळ २-३ tbsp(गरज लागलीच तर)
बेकिंगसाठी:
कुकर/कढई किंवा पॅन
केकचे भांडे
मीठ
कृती :
एका भांड्यामधे खजूर घेऊन ते दुधामध्ये २५-३० मिनिटे भिजत ठेवायचे.
मिक्सर मधून खजुराची बारीक पेस्ट करून घ्यायची.
एका मोठ्या भांड्यात तूप आंणि दही चांगला फेस होईपर्यंत फेटून घ्यावे. या मिश्रणाचा फेस झाल्यावर त्यामध्ये खजूर पेस्ट आणि व्हॅनिला इसेन्स टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे.
कुकरच्या तळाला मीठ टाकून तो १० मिनिटे गरम करायला ठेवायचे.
आधी बनवलेल्या मिश्रणामध्ये नाचणी पीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, रवा आणि मीठ हे सगळे चाळून हलक्या हाताने मिक्स करून एकजीव करून घ्यायचे. पीठ घट्ट वाटल्यास थोडे दूध टाकून एकसारखे करून घ्यावे.
ड्राय फ्रुटस मिक्स करून घ्यायचे.
केकच्या भांड्याला तूप किंवा बटर लावून घ्यावे आणि त्यामध्ये हे मिश्रण ओतावे.
गरम केलेल्या कूकर मध्ये हे भांडे ठेवावे आणि परत शिट्टी काढून नुसते झाकण लावून साधारण २०-३० मिनिटे मंद गॅसवर ठेवावे. साधारण २० मिनिटाने टूथपिक घालून केक शिजलंय का हे बघावे. टूथपिक ला काही लागले नाही तर याचा अर्थ केक तयार.
चलया मग कोणाची वाट बघताय होऊन जाऊ दे पौष्टिक नाचणीचा केक.