हापूस आंब्याला नाव कसं पडलं? जाणून घ्या रंजक इतिहास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हापूस आंब्याला नाव कसं पडलं? जाणून घ्या रंजक इतिहास

हापूस आंब्याला नाव कसं पडलं? जाणून घ्या रंजक इतिहास

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर : कोकणचा राजा म्हणजे आंबा. (Kokan Mango) उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला सगळीकडे आंबेच आंबे पाहायला मिळतात. रस्त्याच्या कडेला, मार्केटमध्ये आंब्याचा तो वास आणि त्याच्या रंगाने नक्कीच मन आकर्षित करते. यात हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि त्याला कारण ही तसेच आहे.

हापुस आंब्याचा रंग तेजस्वी पिवळा, मधुर गंध, गोड चव, दीर्घ काळ टिकणारा असा हा गुणाने वैशिष्ट्यपूर्ण असणारा हापूस.(Hapus Mango)बाजारात अनेक प्रकारचे आंबे असतात. मात्र आंबा घ्यायचा तो हापूस किंवा देवगड (Devgad)असा सर्वांचा अट्टाहास असतो. मात्र या आंब्याची नावे कशी पडली याचा आपण विचार कधी केलाय का. का बर हापूसला हापुस म्हणत असतील कोणी ठेवले असेल याचं नाव. उत्सुकता लागून राहते ना. जाणून घेऊया हापूस चे बारसे कसे झाले. त्याचा रंजक इतिहास.(Ratnagiri-Hapus-Mango-Historical-information-kokan-marathi-news-marathi-news)

खरतर भारतात आंब्याची लागवड चार हजार वर्षापूर्वी झाली. बौध्द भिक्षू ह्युएन सॅंगमुळे भारताला आंबा या पिकाची ओळख झाली. मात्र पोर्तुगीजामुळे आंब्याचा प्रसार जगभर पसरला. जगामध्ये जवळपास 111 देशांमध्ये आंब्याचे पिक घेतले जाते. यामध्ये आंब्याच्या उत्पादनात भारतात 45 टक्के उत्पादन घेतले जाते. भारतात दर वर्षी एकूण 87 कोटी लाख टन आंबे होतात आणि 50 देशांमध्ये पाठवले जातात.

हापूस हे नाव कसे पडले

हापूसची हिस्टरी थोडी मजेशीरच आहे. हापुस आंब्याचे आणखीन एक नाव ते म्हणजे अल्फान्सो. आज मार्केटमध्ये अल्फान्सो देवगड अशा पेट्या पाहायला मिळतात. हा आंबा खरतर कर्नाटकातून येतो. मात्र चवदार हापुस हा केवळ रत्नागिरीतून येतो. हापूसला अल्फान्सो असं म्हणतात आणि याचं नाव ठेवण्यामध्ये पोर्तुगीजांचा मोठा वाटा आहे.

जिऑग्राफिकल इंडिकेशन जर्नल्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, पोर्तुगीज लष्करात अल्फान्सो डे अल्बकर्की नावाचे एक अधिकारी होते. पोर्तुगीजांचे राज्य उभारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. अल्बकर्की जेव्हा गोव्यात वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी खूप भटकंती केली. तिथल्या आंब्याच्या जातीवर त्यांनी अनेक प्रयोग केले आणि ही नवी जात विकसित केली. त्यावरून आंब्याला नाव पडले अल्फान्सो. स्थानिक लोक किंवा ग्रामीण भागात अपूस असे लोक म्हणायचे. महाराष्ट्रात सगळीकडे पोहोचेपर्यंत याचा तोंडी उच्चार हापूस असा झाला.

महाराष्ट्रात आंबा लागवड कोठे होते

महाराष्ट्रात आंब्याच्या महत्त्वाच्या जातीमध्ये हापूस, पायरी, दशेरी, लंगडा, केसर, सुवर्णरेखा, नीलम, तोतापुरी, गोवा माणकूर, बेंगनपल्ली, हिमसागर, बनेशन, ओलूर यांचा समावेश आहे.यामध्ये कोकणामध्ये हापूसचे उत्पादन जास्त घेतले जाते. त्याच बरोबर कोकणातील रायवळ,राजापुरी, तोतापुरी इतर जातींच्या आंब्यांना लोणच्यासाठी मोठी मागणी असते. मराठवाडा व विदर्भात केशर आंब्याची लागवड होते. तर कर्नाटकात अल्फान्सो देवगड आंबा घेतला जातो.

आंब्याचे झाड किती वर्ष फळ देते

आंब्याचे झाड चार पाच वर्षाचे झाले की फळ द्यायला सुरुवात होते. सर्वसाधारणपणे आंब्याचे झाड 50 वर्षापर्यंत फळे देते. आंब्याच्या झाडाची निगा योग्य राखली आणि खत दिले तर हे झाड शंभर वर्षापर्यंत देखील फळ देते. यावर्षी झालेली आंब्याची विक्रीच कोकणच्या हापूसला विक्रमी भाव मिळाला. राजापूर मधील बाबू अवसरे या शेतकऱ्याच्या पाच डझन हापूस आंब्याला विक्रमी दर मिळाला. या पाच डझन पेटीची किंमत होती. एक लाख आठ हजार. मुंबईच्या अंधेरीतील मॅरिएट हॉटेलमध्ये हा लिलाव झाला होता. असा हा गुणी आंबा तुम्ही खाल्ला असालच.

loading image
go to top