रेसिपी : नारळ-गुळाचे लाडू

वैद्य विक्रांत जाधव
Saturday, 29 August 2020

गणेशोत्सवाचा नववा दिवस रविवार (ता. ३०). मोदक आणि लाडू बाप्पाचे आवडते पदार्थ आहेत. अन् उत्सव अधिकच गोड करण्यासाठी नारळ-गुळाचे लाडू करायला तर हवेतच. नारळ आणि गुळ ही जोडी नेहमीच चव आणते. 

गणेशोत्सवाचा नववा दिवस रविवार (ता. ३०). मोदक आणि लाडू बाप्पाचे आवडते पदार्थ आहेत. अन् उत्सव अधिकच गोड करण्यासाठी नारळ-गुळाचे लाडू करायला तर हवेतच. नारळ आणि गुळ ही जोडी नेहमीच चव आणते. 

साहित्य : ओले खोबरेच्या चार वाट्या. गुळ दोन वाट्या. खसखस एक चमचा. तूप. वेलची पूड 

कृती : प्रथम पातेल्यात एक चमचा तूप टाकून त्यात ओल्या खोब-याचा किस व बारीक केलेला गुळ टाकून शिजवावे. मिश्रण घट्ट झाले की त्यात भाजलेली खसखस टाकावी. पातेल्याहून मिश्रण सुटायला लागले की थोडी वेलची पूड टाकावी. गॅस बंद केला व कोमट असताना लाडू वळावे. वेगळ्या चवीचे लाडू तयार. 

गुणधर्म : नारळाचे लाडू अशाक्तपणा कमी करून शरीर धातूंना पुष्ठी देणारे आहेत. खास असल्याने द्रव धातू कमी करून धातुपोषक ठरतात. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read how to make coconut-jaggery laddu nashik marathi news