Recipe: खायला चवदार लागणारी फणसांची मसाल्याची भाजी कशी तयार करायची? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jackfruit

Recipe: खायला चवदार लागणारी फणसांची मसाल्याची भाजी कशी तयार करायची?

भटो रे भटो..कुठं गेला होता? कोकणात..

कोकणातून काय आणलं? फणस !!!

हे बडबडगीत माहीत नाही अशी माणसं विरळंच असतील. फणस मुख्यतः कोकणात आढळतो. खूप मोठ्या आकाराचं हे फळ बाहेरुन काटेरी असतं. अननस आणि केळाच्या मिश्रणाचा स्वाद असलेले याचे गरे असतात.प्रचंड प्रमाणात अँटीआॅक्सिडंट्स उपलब्ध असलेल्या फणसात मानवी शरीराला अनेक उपयुक्त घटक आहेत. हृदयरोग, कॅन्सर अशा रोगांवर फणसाचा खूप चांगला परिणाम होतो. त्याचबरोबरीने डोळ्यांचे त्रास पण फणसाच्या सेवनाने दूर होतात. पेशींचा ऱ्हास होऊ नये यासाठी फणस खूप उपयोगी पडतो.

आजच्या लेखात फणसाची मसाल्याची भाजी कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

मसाला फणसाची भाजी बनवणे खूप सोपे आहे. फक्त शाकाहारी लोकच नाही तर नॉनव्हेज खाणाऱ्यांनीही ही भाजी जरूर खावून पहावी, कारण मसाला फणसाची चव नॉनव्हेजपेक्षा कमी नसते. शिवाय, फणसातही अनेक पोषक तत्व असतात. तुम्ही पोळी, भाकरी आणि भातासोबत सर्व्ह करू शकता. तुम्ही घरी कोरडे मसाले बारीक करून त्याची चव वाढवू शकता. 

हेही वाचा: Malai Peda Recipe: तुळशी विवाह स्पेशल घरच्या घरी तयार करा मलाई पेडा

साहित्य:

1) फणस

2) टोमॅटो

3) कांदा

4) आले लसूण पेस्ट

5) सुकी लाल मिरची

6) लाल मिरची पावडर

7) हळद

8) धने पावडर

9) गरम मसाला

10) जिरे

11) तेल

12) मीठ

हेही वाचा: Winter Recipe: पारंपरिक पद्धतीने बाजरीचा खिचडा कसा तयार करायचा?

कृती:

सर्वप्रथम फणसाचे छोटे छोटे तुकडे करावे. हे करताना हाताला मोहरीचे तेल लावावे यामुळे फणस हातात चिकटत नाही.

नंतर लोखंडी कढईत तेल टाकावे. त्यात जिरे, कोरडी लाल मिरची टाकावी. आता त्यात बारीक चिरलेला कांदा,आले-लसूण पेस्ट घालावी.नंतर त्यात वाफवलेले फणस टाकावे. त्यात धनेपूड, गरम मसाला, हळद, मीठ, तिखट टाकावे. आणि हे मिश्रण चांगले मिक्स करावे. आता त्यात किसलेले टोमॅटो टाकावा. या सर्व गोष्टी नीट फ्राय करून घ्यावे. मसाला शिजल्या नंतर त्यात थोडे पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी. फणस मऊ झाल्यावर गॅस बंद करा. आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी तुमची फणसाची भाजी तयार आहे. तुम्ही ही पोळी, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता.