रेसिपी : कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. पिकलेले फणस आपण आवडीने खातोच, पण त्याचसोबत बाजारात भाजीचे कच्चे फणसही मिळतात. त्या कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी फार चविष्ठ लागते. हे फळ वर्षातून एकदाच मिळते. त्यामुळे त्याची भाजी एकदा तरी बनवून खावीच. ही भाजी कशी करायची ते जाणून घ्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साहित्य - फणसाचे गरे, अर्धी वाटी नारळ, १० आठळ्या, ४ सुक्या मिरच्या, एक बारीक चिरलेला कांदा, गुळ, हिंग, लाल तिखट, हळद, मोहरी, जिरे, गरम मसाला, तेल, गूळ, मीठ.

कृती -

  • सर्वप्रथम फणसाचे गरे सोलावेत. आठळ्या चिरून सोलाव्यात.
  • कमी पाण्यामध्ये किंवा कुकरमध्ये थोडेसे मीठ टाकून २ ते ३ शिट्ट्या काढून गरे आणि आठळ्या शिजवून घ्याव्यात.
  • शिजवून घेतल्यावर टोपलीत उपसून घ्यावेत.
  • ही भाजी करण्यासाठी नेहमीपेक्षा थोडे जास्त तेल लागते. तेलात ५-६ सुक्या मिरच्या, एक मोठा चिरलेला कांदा, मोहरी, जिरे, हिंग, हळद, गरम मसाला, तिखट, थोडा गुळ, मिठ (शिजताना टाकले असल्याने मीठ कमी टाकावे) टाकावे.
  • या फोडणीमध्ये शिजवलेले गरे आणि आठळ्या टाकाव्यात.
  • चांगले परतून मंद आचेवर कढईवर झाकण ठेवून ७-८ मिनिटे वाफ आणावी.
  • नंतर त्यावर अर्धी वाटी ओला नारळ घालावा. 
  • ही भाजी तांदळाच्या भाकरीसोबत अतीशय रुचकर लागते. तर काहीजण भाजी नुसतीसुद्धा खातात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: recipe kacchya fansachya garyanchi bhaji