रेसिपी : कोबीच्या वड्या

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020

बाजारात सहजासहजी मिळणाऱ्या कोबीपासून आपण अनेक पदार्थ तयार करू शकतो. कोबी पौष्टिकही असतो. आज आपण कोबीच्या वड्या कशा तयार करायच्या, हे पाहू.

बाजारात सहजासहजी मिळणाऱ्या कोबीपासून आपण अनेक पदार्थ तयार करू शकतो. कोबी पौष्टिकही असतो. आज आपण कोबीच्या वड्या कशा तयार करायच्या, हे पाहू. 

साहित्य
अडीच कप बारीक चिरलेला कोबी. शक्य असल्यास तो मिक्सरमधून फिरवून बारीक करावा.
  एक कप बेसन
  एक चमचा लाल तिखट किंवा २ बारीक चिरलेल्या मिरच्या
  २ चमचे जिरे पूड
  २ चमचे धने पूड
  २ चमचे गरम मसाला
  चार चमचे तीळ
  ३ चमचे तेल. (शक्य असल्यास मोहरीचे तेल वापरावे.)
  चवीनुसार मीठ
  अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कृती
कोबी, मसाले, मीठ, कोथिंबीर आदी सर्व साहित्य एका परातीत किंवा बाऊलमध्ये एकत्र करावे. यामध्ये अर्धा कप बेसन व थोडे पाणी घालावे. सर्व मिश्रण एकजीव करत गोळा तयार करावा. हा गोळा हाताला चिकटत असल्यास त्याला थोडे तेल लावावे. त्यानंतर आपण कोथिंबीर वडीसाठी करतो त्याप्रमाणे तीनचार लांब रोल तयार करावेत. स्टीमरमध्ये पाणी घालून त्या पाण्याला उकळी आणावी. एका प्लेटला पुरसे तेल लावून त्यात कोबीचे तयार केलेले रोल्स ठेवावेत. आता ही प्लेट स्टीमरमध्ये ठेवा. शेवटी रोलवर हलक्या हाताने तीळ पेरावेत. सुमारे १५ मिनिटे हे स्टीमरमध्ये उकडू द्यावेत. त्यानंतर थंड होऊ द्यावेत. ते थंड झाले की फ्रीजमध्ये ठेवावेत. वड्या  खाण्याच्या आधी तुम्हाला हव्या तशा तेलात हलक्या तळाव्यात. शॅलो फ्राय किंवा फुल फ्राय करुन घ्याव्यात. त्या फुल फ्राय केल्या तर अधिक टेस्टी लागतात. या वरील प्रमाणानुसार बनविलेल्या वड्या साधारणपणे सहा-सात लोकांसाठी पुरेशा आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: recipe kobichya vadya