रेसिपी : बेसन पेढा

मिश्रण थोडेसे गार करा व पेढे बनवा.हवे असल्यास वरती पिस्त्याचे काप लावा.
recipe
recipesakal

साहित्य : १ कप बेसन पीठ, १ कप साखर, १ कप दूध, अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट, ४ टेबलस्पून तूप, केशर, वेलदोडा पूड.

कृती :

बेसन पीठ चाळून घ्या. दूध व डेसिकेटेड कोकोनट मिक्सरला फिरवून घ्या. एका पॅनमध्ये तूप घाला. ते वितळले, की त्यात बेसन घालून हलकासा कलर बदलेपर्यंत सहा-सात मिनिटे भाजून घ्या. नंतर त्यामध्ये साखर घाला. दूध व डेसिकेटेड कोकोनटचे मिश्रण घाला. नंतर त्यामध्ये साखर घाला. घट्टसर परता. असल्यास केशर दुधात मिसळून घाला. वेलदोडा पूड घाला. मिश्रण पॅनमधून सुटून येईपर्यंत परता.मिश्रण तयार झाले का, ते पाहण्यासाठी मिश्रणाची हातात घेऊन गोळी करून पाहा. ती हाताला चिकटता कामा नये.नंतर मिश्रण थोडेसे गार करा व पेढे बनवा.हवे असल्यास वरती पिस्त्याचे काप लावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com