esakal | बिर्याणी करताना तांदूळ ओव्हर कूक होतो? फॉलो करा 'या' ३ टीप्स
sakal

बोलून बातमी शोधा

Biryani

बिर्याणी करताना तांदूळ ओव्हर कूक होतो? फॉलो करा 'या' ३ टीप्स

sakal_logo
By
शर्वरी जोशी

अस्सल खवय्यांचा विक पॉइंट म्हणजे बिर्याणी. मूळ पर्शियन असलेला हा पदार्थ आज प्रत्येक भारतीय आवडीने खातो. विशेष म्हणजे आता बिर्याणीचे अनेक प्रकारही सहज पाहायला मिळतात. यामध्येच दम बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी, चिकन बिर्याणी हे काही प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. परंतु, दरवेळी बाहेरुन आणलेली विकतची बिर्याणी खाण्यापेक्षा अनेक जण घरीच तयार करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अनेकदा ही बिर्याणी हॉटेलप्रमाणे मोकळी किंवा छान दाणेदार होत नाही. बऱ्याचदा बिर्याणीचा तांदूळ ओव्हर कूक होतो आणि बिर्याणीचा चक्क मसालेभात होतो. म्हणूनच, बिर्याणी करताना तांदूळ ओव्हर कूक होऊ नयेत यासाठी काय करावं ते जाणून घेऊयात. (recipe-tips-how-to-cook-perfect-rice-ssj93)

१. पाण्याचं योग्य प्रमाण -

बिर्याणी करताना प्रथम तांदूळ ७० ते ८० टक्के शिजवून घ्यावा लागतो. त्यामुळे कधीही हा तांदूळ शिजवताना त्यात पाण्याचं योग्य प्रमाण असणं अत्यंत गरजेचं आहे. जर पाणी जास्त झालं तर तुमचा भात ओव्हर कूक होईल किंवा त्यात जास्त पाणी राहिल्यामुळे तो पचपचीत होईल. त्यामुळे १ वाटी तांदूळ असेल तर त्यात २ वाट्या पाणी घाला. तसंच जर तुम्ही कुकरमध्ये तांदूळ शिजवत असाल तर मग १ वाटी तांदूळासाठी दीड वाटीच पाणी घ्या. तांदूळ शिजून झाल्यानंतर एका पसरट चाळणीमध्ये तो मोकळा करुन ठेवा ज्यामुळे तांदळाचे दाणे एकमेकांना चिकटणार नाहीत.

२. लिंबाचा रस -

बिर्याणीचा तांदूळ मोकळा व पांढरा शुभ्र होण्यासाठी तो शिजत असताना त्याच एका लिंबाचा रस टाका. तसंच चिमुटभर मीठदेखील घाला.

३. तूप किंवा बटर -

तांदूळ शिजवण्यापूर्वी कायम तो ३-४ पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर पातेल्यात २-३ चमचे तूप किंवा बटर घाला आणि त्यावर थोडासा तांदूळ परता. मग पाणी घालून तो शिजवून घ्या. यामुळे तांदूळ मोकळा होतोच परंतु, त्याला एक विशिष्ट प्रकारचा सुवासदेखील येतो.

loading image
go to top