स्टीम किंवा फ्राइड मोमोजचा कंटाळा आलाय? ट्राय करा मसाला मोमोज

शिल्लक राहिलेल्या मोमोजपासून करा भन्नाट रेसिपीज
eating momos is bad for your health
eating momos is bad for your health

पार्टी म्हटलं की मज्जा मस्ती आणि खाण्याची मोठी चंगळ असते. त्यामुळे घरी एखाद्या पार्टीचं आयोजन केलं की सहाजिकच जेवणात दररोजचे तेच ते पदार्थ खाण्यापेक्षा काही तरी छान चमचमीत, मसालेदार पदार्थ ऑर्डर केले जातात. मात्र, बाहेरून आणलेले हे पदार्थ बऱ्याचदा पार्टी झाल्यावर शिल्लक राहतात. त्यामुळे हे पदार्थ पुन्हा टाकून देणंही जिवावर येतं. त्यामुळेच जर पार्टीमधील काही पदार्थ शिल्लक राहिले असतील आणि खासकरुन ते मोमोज असतील तर ते टाकून देण्यापेक्षा त्यापासून भन्नाट असे मसाला मोमोज नक्की ट्राय करुन पाहा. (recipe tips know about some leftover momos new recipes)

साहित्य -

मोमोज - ८

कांदा - १ कप बारीक चिरलेला

हिरवी मिरची - २

कांद्याची पात - अर्धा कप

आलं-लसूण पेस्ट - १ टी स्पून

रेड चिली सॉस - १ टेबल स्पून

पास्ता मसाला - १चमचा

टोमॅटो सॉस किंवा केचअप - २ चमचे

फ्रेश क्रीम किंवा मेयोनीज - १ कप

धणेपूड - आवश्यकतेनुसार

मीठ - चवीनुसार

तेल

कृती -

मसाला मोमोज तयार करण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. त्यात आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेली मिरची, रेड चिली सॉस, टोमॅटो केचअप, पास्ता मसाला घाला व मंद आचेवर सगळं मिक्स करुन घ्या. (पास्ता मसाला नसल्यास मॅगी मसाला किंवा चिकन मसालादेखील वापरु शकता.) त्यानंतर थोडीशी धणेपूड व चवीनुसार मीठ अॅड करा. आता यात मेयोनीज टाकून छान मिक्स करुन घ्या. तयार मसाला थोडासा ग्रेव्ही टाइप झाल्यावर त्यात शिल्लक राहिलेले मोमोज टाका व मंद आचेवर पुन्हा परतून घ्या. सगळा मसाला मोमोजला लागेल याची काळजी घ्या. त्यानंतर यात बारीक चिरलेली कांद्याची पात अॅड करुन सर्व्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com