साहित्य - १ छोटा पेला गव्हाचे पिठ, १/२ टी स्पून मीठ, १ टी स्पून तेल.
आमटीसाठी - अर्धा छोटा पेला तूर डाळ.
फोडणीसाठी - १ टी स्पून तूप, थोडी मोहोरी, थोडे जिरे, चिमूटभर हिंग, थोडी हळद, थोडे तिखट, १ हिरवी मिरची, ४ ते ५ कढीपत्ता पाने, २ टे. स्पून कोथिंबीर बारीक चिरून, २ आमसुलं, चवीसाठी गूळ, १ टी स्पून गोडा मसाला, २ टे. स्पून ताजे खोवलेले नारळ, साजूक तूप.

कृती - तूरडाळ कुकरमध्ये मऊसर शिजवून नंतर घोटून घ्यावी. गव्हाचे पिठ, मीठ आणि १ टी स्पून तेल घालून पोळीसाठी मळतो, तशी कणिक मळून घ्यावी.
कढईत १ टी स्पून तूप गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट, मिरची आणि कढीपत्ता पाने घालून फोडणी करावी. कोथिंबीरही फोडणीत घालून परतावी. घोटलेली डाळ फोडणीस घालावी. अर्धा कप पाणी घालून डाळ थोडी पातळसर करावी. गोडा मसाला, मीठ, आमसुलं, नारळ आणि गूळ घालून मध्यम आचेवर आमटीला उकळी येऊ द्यावी. उकळी येत असताना कणकेची पोळी लाटावी. कातणाने किंवा सुरीने मध्यम आकाराचे शंकरपाळे करून उकळत्या आमटीत घालावे. पाच मिनिटे उकळी काढून ते शिजू द्यावे.
टीप - कणिक मळताना त्यात थोडा ओवा, लाल तिखट, हळद घातली तरी चांगली चव येते. आंबटपणासाठी आमसुलाऐवजी चिंचेचा कोळ घातला तरी चालेल.