रेसिपी : डिंक लाडू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिंक लाडू

रेसिपी : डिंक लाडू

साहित्य : १/२ किलो खारीक, १/२ किलो सुके खोबरे, डिंक १/२ पावशेर, गूळ पावशेर, साखर १ वाटी, वेलदोडे, जायफळ, खसखस, पाणी १ वाटी इत्यादी.

कृती : प्रथम खारीक बिया काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. खोबरे भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. डिंक तळून घ्या. जायफळ, वेलदोडा, खसखसची पूड करून घ्या. पाक करण्यासाठी मोठ्या भांड्यात १ वाटी तूप घालावे. नंतर गूळ व साखर घालावी व १ वाटी पाणी घालावे. गूळ व साखर विरघळले, की गॅस बंद करावा. त्यात बारीक केलेली जायफळ, वेलदोडा व खसखस पूड घालावी. नंतर बारीक केलेले खोबरे व खारीक घालावी. नंतर तळलेला डिंक चुरून घालावा व सर्व मिश्रण एकजीव करावे. शेवटी छान लाडू वळावेत.

हे लक्षात ठेवा

भेंडी चिरताना हाताला थोडेसे तेल लावल्यास भेंडीचा बुळबुळीतपणा हाताला न लागता काम सोपे होते. चिवडा कुरकुरीत होण्यासाठी पोहे दोन-तीन दिवस कडकडीत उन्हात वाळवावेत.

loading image
go to top