

Easy Sattu Buttermilk Recipe for Instant Cooling and Digestion Boost for Busy Summer Mornings
sakal
Easy Sattu Buttermilk Recipe for Instant Cooling and Digestion Boost: सकाळची सुरुवात छान झाली तर पूर्ण दिवसच हलका आणि फ्रेश वाटतो. नाश्ता असा असावा जो पटकन होईल, पोटाला जड जाणार नाही आणि शरीराला एनर्जीही देईल. उन्हाळ्यात तर अजूनच हलकं आणि थंडावा देणारं काहीतरी हवं असतं आणि कधी कधी तर काही खावंसं सुद्धा वाटत नाही. अशावेळी सत्तूचं ताक हा एकदम साधा पण भन्नाट पर्याय आहे. मिनिटांत तयार होणारा हा देसी ड्रिंक तुम्हाला आतून थंड ठेवतो, पोट शांत ठेवतो आणि दिवसभर ताजेतवाने वाटायला मदत करतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात काहीतरी वेगळं आणि हेल्दी ट्राय करायचं असेल, तर हे ताक नक्की करून पाहा.