

Swap Rava or Poha for Semiya Upma: A Light, Flavorful Indian Breakfast With Cashews and Herbs
esakal
Semiya Upma Recipe: नाश्त्यासाठी नेहमीच रव्याचा उपमा किंवा पोहे खाऊन कंटाळा आला असेल, तर शेवयांचा उपमा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. शेवयांना हिंदीत सेवया आणि दाक्षिणात्य भाषांमध्ये Semiya असे म्हंटले जाते. सामान्यतः गोड खीर बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शेवयांचा हा खमंग प्रकार नाश्त्यासाठी अत्यंत चविष्ट आणि झटपट तयार होणारा आहे.
शेवयांचा उपमा हा पचायला हलका असतो आणि कमी वेळात बनवून तयार होतो. हवे असल्यास यात किसलेले गाजर, वाफवलेले मटार, कोबी, उकडलेले स्वीट कॉर्न किंवा फरसबी घालून अधिक पौष्टिक बनवता येते.