Shahi Mushroom Recipe: हॉटेल सारखी बनवा घरच्या घरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahi Mushroom Recipe: हॉटेल सारखी बनवा घरच्या घरी

Shahi Mushroom Recipe: हॉटेल सारखी बनवा घरच्या घरी

मशरूमचे फायदे बरेच आहेत. हे औषध म्हणून देखील वापरले जाते. मशरूमची भाजी पौष्टिक आणि चवपूर्ण आहे. बरेच लोक मोठ्या उत्साहाने हे खातात. चला तर मग जाणून घेऊयात हॉटेल सारखी टेस्टी रॉयल मशरूमची रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची.

हेही वाचा: चटपटीत चवीचे गोबी धपाटे कसे बनवावे? जाणून घ्या रेसिपी

साहित्य

- 200 ग्रॅम मशरूम,

- 4 कांदे,

- 7-8 टोमॅटो,

- 1 तुकडा आले,

- 2 हिरव्या मिरच्या,

- 1/2 चमचे मीठ,

- 1/2 चमचे लाल तिखट,

- 1/2 चमचे गरम मसाला,

- 1 चमचे साखर,

- 1 कप मलई,

- 1 / २ कप काजूची पेस्ट,

- टीस्पून तूप,

- १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर.

हेही वाचा: खाण्यातील स्वाद वाढवायचा असेल तर 'अशी' बनवा 'चिली ऑईल' रेसिपी

कृती

- मशरूमचे तुकडे करून घ्या. कांदा, टोमॅटो, आले आणि हिरव्या मिरच्या चिरून घ्याव्यात.

- कढईत तूप गरम करावे, तेल गरम झाल्यावर कांदा घालून गुलाबी होईस्तोवर तळा. आता त्यात टोमॅटो, आले आणि हिरव्या मिरच्या घाला.

- टोमॅटोही चांगले भाजले की ते आचेवर काढून थोडेसे थंड होऊ द्या. हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

- आता पातेल्यात मीठ, तिखट, गरम मसाला, साखर, मलई आणि काजूची पेस्ट घाला.

- दोन मिनिटे शिजवा आणि त्यात मशरूम घाला, मंद आचेवर पाच मिनिटे शिजू द्या. वरून कोथिंबीर घाला व शाही मशरूम नान किंवा पराठे बरोबर सर्व्ह करा.

टॅग्स :recipe