
प्रत्येकाच्या घरी पाहुणचाराचा भाग म्हणून पानसुपारीचे तबक ठेवले जायचे.असा हा साधारण वाटणारा विडा व त्यातील जिन्नस यांचे महत्त्व इतके अनन्यसाधारण आहे,हे बारकाईने विचार केल्याशिवाय जाणवत नाही.
पुरातन काळापासून ते वर्तमानापर्यंत, अबालवृद्धांसोबत खेळलो आहे मी रंगपंचमी इतिहास-पुराणांपासून शौकिनांच्या रंगवल्या आहेत मैफिली मनोरंजन किंवा धार्मिक, कोणतेही असो कार्य माझ्याशिवाय नाही हालत पान नाना चवींचा व रंगाढंगांचा मी, माझ्यामुळे अनेक व्यावसायिकांची उंचावली आहे मान माझ्यातला प्रत्येक जिन्नस आरोग्यदायी, गुणकारी अन् खास मानपान, मुखवास अन् देवीच्या प्रसादात माझी उपस्थिती असते हमखास मात्र होतो मी दुःखी जेव्हा काहीजण माझा रस्त्यावर टाकतात सडा चला तर मला ओळखण्याचा उचला आता विडा
‘विडा’. त्रयोदशगुणी, गोविंद, रेणुकामातेचा विडा हे काही विड्याचे प्रकार. प्रत्येकाचे गुणधर्मही विशेष. आणखीन एक विशेष बाब म्हणजे विड्यातील काही जिन्नसांवरून बोलीभाषेत विडा उचलणे, पानसुपारी देणे, पाने पुसणे, चुना लावणे, सुपारी देणे, असे अनेक वाक्प्रचार आहेत. पूर्वीपासून विड्याचे जिन्नस ठेवण्याचे व विडा बनविण्याचे साहित्यही खास आणि प्रतिष्ठेचे. मला आठवते, विदर्भाच्या प्रवासात प्रत्येकाच्या घरी पाहुणचाराचा भाग म्हणून पानसुपारीचे तबक माझ्यापुढे ठेवले जायचे. तर असा हा साधारण वाटणारा विडा व त्यातील जिन्नस यांचे महत्त्व इतके अनन्यसाधारण आहे, हे बारकाईने विचार केल्याशिवाय जाणवत नाही. पाने, सुपारी, चुना, कात, बडीशेप, लवंग, वेलचीसारख्या मसाल्यांनी युक्त विडा हा भोजनोत्तर पाचक व मुखशुद्धी करणारा आहे. कपूरी, मघई, कलकत्ता, बनारसी, हे पानांचे काही प्रकार उष्ण, तिखट तर काही खाताच तोंडात विरघळून जाणारे. ही पाने सर्दी, खोकला, अस्थमा अशा आजारांमध्येही उपयोगी येतात.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
आवडीनुसार, प्रसंगानुसार व ऐपतीनुसार विड्यात नानाप्रकारांचे जिन्नस पडतात. लहानमुलांच्या विड्याव्यतिरिक्त चुना, कात, सुपारी, बडीशेप या महत्त्वाच्या घटकांशिवाय विडा बनविला जात नाही. चुन्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे नियमित व योग्य प्रमाणात सेवन केल्यास हाडे बळकट होतात. आयुर्वेदानुसार, सुपारीच्या फळ, फूल व पानांचा विविध आजारांवर उपयोग होतो. विड्याला रंगत येते ती कातामुळे. कंठसुधारक, रक्तस्राव, त्वचारोग, मूळव्याध यांवर कात गुणकारी आहे. बडीशेप रक्तशुद्धी, मुखशुद्धी, मळमळ, वात, खोकला,अजीर्ण अशांसारख्या विकारांवर उपयुक्त आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
रेणुकामातेचा विडा
साहित्य - विड्याची पाने, सुपारी, बडीशेप, ओवा, चुना, कात, जायफळ पूड, लवंग, वेलची, धने, ज्येष्ठमध, थंडाई.
कृती -
१. थंडाई सोडून सर्व जिन्नस जाडसर व एकत्रित कुटून घेणे.
२. थंडाई घालून सर्व एकत्रित करणे.
टीप- मिश्रणाला खूप पाणी सुटल्यास वरून थोडी बडीशेप घालून एकत्रित करावे.