हेल्दी रेसिपी : हिवाळा आणि सातूचे पीठ...

शिल्पा परांडेकर
Tuesday, 1 December 2020

हेमंत व शिशिर ऋतू अर्थात हिवाळा. आल्हाददायक, विलोभनीय आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा ऋतू. हिवाळी पदार्थांच्या मेजवानीची बात तर काही औरच! या ऋतूत भाजीपाला, फळे यांची अक्षरशः लयलूट असते. पूर्वी हिवाळा आला म्हणजे ट्रंकेत ठेवलेले उबदार कपडे जसे टुणकन उडी मारून आपल्याला लपेटून घ्यायचे, तसेच शरीराला ऊब देणारे खास हिवाळी पदार्थ आजी-आईच्या बटव्यातून बाहेर पडायचे.

हेमंत व शिशिर ऋतू अर्थात हिवाळा. आल्हाददायक, विलोभनीय आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा ऋतू. हिवाळी पदार्थांच्या मेजवानीची बात तर काही औरच! या ऋतूत भाजीपाला, फळे यांची अक्षरशः लयलूट असते. पूर्वी हिवाळा आला म्हणजे ट्रंकेत ठेवलेले उबदार कपडे जसे टुणकन उडी मारून आपल्याला लपेटून घ्यायचे, तसेच शरीराला ऊब देणारे खास हिवाळी पदार्थ आजी-आईच्या बटव्यातून बाहेर पडायचे. डिंक-हळीवाचे लाडू, चिक्की, तिळाचा वापर करून केलेले विविध पदार्थ, ताज्या भाज्यांची लोणची, पराठे, थालीपिठे, वडे... बापरे! ही यादी तर बरीच मोठी होईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हिवाळ्यातील सण व सार्वजनिक कार्यक्रमांनाही उत्साहाचे उधाण आलेले असते. दिवाळी, चंपाषष्ठी, भोगी, संक्रांत अशा सणांमधून लाडू, चकली, रोटगे-भरीत, तिळाचे पदार्थ, मिश्र भाजी अशांसारख्या पदार्थांची मेजवानी तर पूर्वी पोपटी, हुरडा हावळाच्या मेजवानीच्या निमित्ताने मनोरंजन व श्रमपरिहारही योजला जायचा. आजकाल ग्रामीण भागाबरोबरच शहरातही अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हा काळ म्हणजे आरोग्य संपन्न करण्याचा काळ. या ऋतूत योग्य आहार व योग्य व्यायाम केल्याने मन व शरीर सुदृढ बनते. या काळात भूकही वाढलेली असते आणि पचनशक्तीही चांगली असते. त्यामुळे नकळत अरबट-चरबट पदार्थ खाल्ले जाण्याची शक्यता असते. किंवा मग एखादा झटपट परिणाम साधण्याच्या घाईत ‘फॅन्सी डाएट’ अथवा ‘रेडीमेड हेल्दी फूड’ घेतले जाण्याची शक्यता असते.

बऱ्याचदा चुकीच्या समजुतीमुळे किंवा धावपळीमुळे आपल्याकडून नाष्टा घेतला जात नाही. शिवाय सध्या लोकांचा नाष्ट्यासाठी झटपट बनणाऱ्या किंवा ‘रेडी टू इट’ पदार्थांकडे कल वाढत चालला आहे. त्याऐवजी आपल्या समृद्ध खाद्यपरंपरेतील अनेक पौष्टिक पदार्थांना आपण आहारात समाविष्ट करू शकतो. नाचणी सत्त्व, कण्या, सत्तूचे पीठ असे काही ‘रेडी टू इट’ पदार्थ बनवून ठेवू शकतो; जेणेकरून झटपट नाष्टा तयार होईल व नाष्टा घेणे चुकणारही नाही.

सातूचे पीठ
साहित्य :
गहू, हरभरा डाळ प्रत्येकी १ वाटी, तांदूळ अर्धा वाटी, जायफळ, वेलची व सुंठपूड, गूळ.

कृती :
१.गहू, डाळ व तांदूळ वेगवेगळे भाजून एकत्रित दळून घेणे.
२. साखर/गूळ, जायफळ, वेलची व सुंठपूड, दूध किंवा पाणी घालून नुसतेच किंवा शिजवून खाणे.

टीप - या पिठापासून शिरा, लाडू, porridge किंवा स्मूदी बनविता येईल. या पिठामध्ये इतर डाळींचाही वापरत करता येऊ शकतो.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shilpa Parandekar Write Article on Healthy Recipe