esakal | वालाचं बिरडं : शिवानी बावकरची आवडती डीश; पाहा रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

shivani bavkar

वालाचं बिरडं : शिवानी बावकरची आवडती डीश; पाहा रेसिपी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वालाचं बिरडं आवडतं : अभिनेत्री शिवानी बावकर

माझ्या पहिल्या मालिकेच्या वेळी साताऱ्यातील चांदवडी गावात शिंदे काकूंच्या हातची मेथीची भाजी मला खूप आवडायची.

माझ्या पहिल्या मालिकेच्या वेळी साताऱ्यातील चांदवडी गावात शिंदे काकूंच्या हातची मेथीची भाजी मला खूप आवडायची. त्यात त्या शेंगदाण्याचा कूट घालायच्या. त्यामुळे ती भाजी खूपच अप्रतिम लागायची. ती भाजी बनवली, की मला आवर्जून त्या बोलवायच्या आणि मी प्रॉडक्शन हाउसची परवानगी घेऊन त्यासाठी धावत जायचे.

मला स्वयंपाक करणं तितकं आवडत नाही; पण अधूनमधून प्रयोग करते. खाण्यात मला खरंतर काही आवडत नाही असं नाही. कारण, माझ्या आईनं मला सर्वच पदार्थ खाण्याची सवय लावली आहे. माझी आई वालाचं बिरडं फार छान करते. ते मला खूप आवडतं. त्यात ती नारळाचा रस घालते. त्याची रेसिपी सांगायची म्हणजे तेलात जिरे, कढीपत्ता आणि हिंग याची फोडणी करून त्यात कांदा घालायचा आणि तो परतून झाला, की वाल टाकायचे. नंतर हळद, आपला साठवणीचा मसाला, मीठ घालून ते थोडावेळ परतायचे. थोडा आल्याचा तुकडा ठेचून टाकायचा व पाणी टाकून शिजवावे, शिजत आलं की त्यात नारळाचा रस आणि गूळ टाकावा. मग तो पदार्थ खूप छान होतो.

आणखी एक आवडती रेसिपी म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या. तेलात थोडे मेथीचे दाणे टाकून फोडणी करावी आणि त्यावर बारीक पातळ चिरलेले बटाटे टाकावेत. त्यात मिरची पावडर आणि मीठ व चिमूटभर साखर टाकून ते मिक्स करून वाफेवर शिजवावे. त्या अगदी उत्तम होतात.

loading image
go to top