esakal | दसरा 2021- आज करा श्रीखंड टार्ट| Shrikhanda Tart Recipe
sakal

बोलून बातमी शोधा

दसरा 2021- आज करा श्रीखंड टार्ट

दसरा 2021- आज करा श्रीखंड टार्ट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

दसर्‍याला सगळेचजण श्रीखंड करतात. घरी चक्का तयार करून तो पुरणाच्या यंत्रातून काढून त्याचे श्रीखंड करायला अनेकांना आवडते. अनेकांकडे असे श्रीखंड असते. पण बरेचदा हे श्रीखंड खूप उरते. अशावेळी त्याचा वेगळा उपयोग करता येईल. त्यासाठी श्रीखंड टार्ट हा प्रकार करून बघा.

साहित्य-

टार्टसाठी- 1 कप बारीक शेवया, आवडीप्रमाणे कंडेन्स मिल्क, गरजेप्रमाणे तूप

श्रीखंडासाठी- एक कप दही, 1/2 पिठीसाखर, 2 मोठे चमचे थंडाई मसाला, सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स, डाळींबाचे दाणे

कृती- 

टार्ट तयार करण्यासाठी कढईत तूप गरम करून त्यात शेवया ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्या. रंग बदलल्यावर त्यात कंडेन्स मिल्क घालून मिक्स करून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर छोट्या वाट्या घेऊन त्यांना तुपाचा हात लावून त्याच्या आत शेवयाचे मिश्रण घाला. त्याला वाटीचा आकार मिळण्यासाठी व्यवस्थित दाबून त्या फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा.  त्यानंतर श्रीखंडासाठी लागणारे सर्व साहित्य एकत्र करून श्रीखंड करून ठेवा. खायला देतेवेळी शेवई टार्टमध्ये श्रीखंड घालून ड्रायफ्रुट्स आणि डाळींब्याच्या दाण्याने सजवा. वरून थंडाई मसाला भुरभुरावा.

loading image
go to top