esakal | Food Recipe - ट्राय करा, कडू कारल्याची एक वेगळी रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

Food Recipe -  ट्राय करा, कडू कारल्याची एक वेगळी रेसिपी

Food Recipe - ट्राय करा, कडू कारल्याची एक वेगळी रेसिपी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कारलं म्हटंल की कडूपणा आलाच. हा कडवटपणा निघून जावा यासाठी बरेच उपाय करुन पाहतात. अनेकांना कारल्याची भाजी आजिबात आवडत नाही. त्यामुळे ही भाजी खाण्यास अनेकजण तयार नसतात. मात्र याच कारल्याची आज एक सोपी रेसपी तुम्हाला सांगणार आहोत. जी चवीला तर उत्तम आहेच, शिवाय तुमच्या तोंडाला कडूपणा आणणार नाही. कारल्यामुळे पित्त नाहीसे होते. अनेक डॉक्टर पित्ताचा त्रास असणाऱ्यांना कारल्याची भाजी खाण्याचा सल्ला देतात. परंतु कडवटपणामुळे तुम्ही ते खाणे टाळता. या रेसिपीमुळे कदाचित कारल्याची भाजी फेवरेटही होऊ शकते.

साहित्य -

  • कारले - २

  • शेंगदाण्याचा कुट - २ चमचे

  • चिरलेला बारीक कांदा - २ वाटी

  • चिरलेला बारीक टोमॅटो - १ वाटी

  • मीठ - आवश्यकतेनुसार

  • तेल - आवश्यकतेनुसार

  • गूळ - आवश्यकतेनुसार

  • चिरलेली बारीक कोथिंबीर - आवश्यकतेनुसार

  • हिंग-जीरे पावडर - आवश्यकतेनुसार

कृती -

सुरुवातीला कारले स्वच्छ धुऊन घ्यावे. यानंतर त्याला मधून चिरून त्यात मीठ भरावे. तसेच कारल्याच्या वरच्या बाजूला मीठ लावून घ्यावे. काही तासांसाठी हे कारले तसेच मुरवत ठेवावे. यानंतर काही तासांनी कारली उकडून घ्यावी. आणि त्यातील बिया काढून टाकाव्या. दुसरीकडे चिरलेला बारीक कांदा, टोमॅटो आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट याचे मिश्रण करावे. या तयार मिश्रणामध्ये मीठ आणि हिंग जीरे पावडर घालावी. हे मिश्रण त्या कारल्याच भरावे. गरम तेलात ही कारणे भाजून घ्यावीत. तळाताना किंवा भाजताना तेलाचे प्रमाण अतिशय कमी ठेवावे. त्यावर झाकण ठेऊन ते वाफवून घ्यावे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार थोडासा गुळ किसून घालावा. कारल्याची भाजी तयार आहे. तुम्ही गरमा गरम भाकरी सोबत ही भाजी खाऊ शकता.

loading image
go to top