esakal | चैत्र नवरात्रीत गोड 'राजभोग'ची रेसिपी नक्की ट्राय करा

बोलून बातमी शोधा

चैत्र नवरात्रीत गोड 'राजभोग'ची रेसिपी नक्की ट्राय करा
चैत्र नवरात्रीत गोड 'राजभोग'ची रेसिपी नक्की ट्राय करा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : चैत्र नवरात्रीचा सण सुरू आहे. यादरम्यान गोड खांद्यावर जास्त भर असतो. चैत्र नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो. ज्याला दुर्गापूजा म्हणूनही ओळखले जाते. या दिवसांत दुर्गेची विविध रुपात पूजा बांधली जाते. या दिवसातल्या सर्व पूजा महत्वाच्या मानल्या जातात. नवरात्री स्पेशल रेसिपी राजभोग ही एक बंगाली गोड डीश आहे. ही फक्त बंगालमध्येच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. ही एक पारंपारिक मिठाई आहे. त्यामुळे काही खास क्षणांसाठी किंवा सणांदरम्यान ही बनवली जाते. या डिशचा स्पंज रसगुल्ल्याप्रमाणे असतो. यामध्ये फरक इतकाच त्याला आतमध्ये सुखा मेवा असतो. हे गोळे रसगुल्ला पेक्षा आकाराने थोडे मोठे असतात. या रेसिपीला घरी बनवने खुप सोपे आहे. ते आज आपण पाहणार आहोत..

साहित्य -

  • 1 टेबल स्पून मैदा

  • 2 कप पाणी

  • 1/2 किलो साखर

  • 1/4 टी स्पून सोनेरी फूड कलर

  • 1/8 टी स्पून केशर

  • 1 टी स्पून वेलदोडे पाउडर

  • 8 उकळलेले बादाम

  • 8 उकळलेले पिस्ता

कृती -

केशर आणि वेलदोडे पावडर, बदाम, पिस्ता एकत्र करून घ्या. पाण्यामध्ये साखर घालून त्याला मंद गॅसवर ठेवून हलवत रहा. जेणेकरून ते एकजीव होईल. यानंतर पनीर आणि मैद्याला सॉफ्ट होईपर्यंत मिक्स करा. या मिश्रणाचे सहा ते आठ असे समान गोलाकार गोळे तयार करुन घ्या. यामध्ये ड्रायफूट्स मिश्रण घाला. गोल बॉलप्रमाणे तयार करू पाण्यामध्ये सोडा. साखर गरम झाल्यानंतर त्यामध्ये फुड कलर मिक्स करा. आणि या पाण्यात पनीरचे गोळे टाकून नंतर मोठ्या गॅस वरती 15 ते 20 मिनिटे शिजवून घ्या. पाच मिनिटानंतर पाणी सोडत राहा. जेणेकरून ती साखर घट्ट होणार नाही. तुमचे गोड राजभोग खाण्यासाठी तयार आहेत.