Stuff Idli Roll: रेसिपी पाहूनच तोंडाला सुटेल पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stuff Idli Roll: रेसिपी पाहूनच तोंडाला सुटेल पाणी

Stuff Idli Roll: रेसिपी पाहूनच तोंडाला सुटेल पाणी

पुणे: दक्षिण भारतीय पदार्थांपैकी इडली मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. नाश्त्यापासून ते अगदी कोणत्याही वेळी खाण्यासाठी इडली चालते. इडली तयार करणं खूप सोपं आहे. त्यातीलच चेंज म्हणून तुम्ही स्टफ इडली रोलची रेसिपी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात याची झटपट रेसिपी.

हेही वाचा: तोंडाला चव येईल! मिश्र डाळींच्या पाट वड्यांची रेसिपी एकदा करून पहा

साहित्य:

- इडली पीठ

- उकडलेले बटाटे

- बारीक चिरलेला कांदा

- बारीक चिरलेली मिरची

- कोथिंबीर

- कढीपत्ता

- हळद आणि मीठ

फोडणीसाठी: तेल, मोहरी, पांढरे/काळे तीळ, कोथिंबीर मिरची बारीक चिरून आणि कढीपत्ता.

हेही वाचा: Papdi Chaat Recipe: पावसाळ्यात घरीच बनवा ही सोप्पी रेसिपी

कृती:

- प्रथम उकडलेले बटाटे कुस्करून त्यात कांदा, मिरची, कोथिंबीर, मीठ आणि हळद घालून एकजीव करून त्याचे रोल करून घ्यावे. आणि स्टीलचा उभा पेला घेऊन त्याला आतून तेल लाऊन घ्यायचे.

- त्यात थोडे इडली पीठ टाकून बटाट्याचा रोल बरोबर मध्ये उभा राहील असा ठेऊन पुन्हा त्यावर इडली पीठ घालावे.

- रोल बुडेल इतपत पीठ घाला.

- आता इडली पात्रात एखादी जाळी ठेऊन त्यावर एक ताटली ठेवावी व त्या ताटलीत इडली चे पेले ठेवावे व इडली उकडून घ्यावी.

- ही इडली उकळायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो.

- सुरी किंवा चमचा अगदी खालपर्यंत टोचून पहावे की, इडली पूर्ण उकडली गेली आहे का.

- मग हे पेले थंड झाल्यावर सुरीच्या साहाय्याने इडली चारी बाजूने मोकळी करून मग पूर्ण रोल काढून घ्यावा.

- आता एका तव्यावर फोडणी करून घ्यावी व त्यात हे रोल फिरवून घ्या

- अशाप्रकारे डिश तयार झाली. याचा गरम गरम आस्वाद घ्या.

Web Title: Stuff Idli Roll In Marathi Recipe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :recipe