
home remedies for heat: उन्हाळा सुरू होताच सर्वजण थंडपेयांचे सेवन करतात. त्यात एक घरगुती पेय म्हणजे ताक. उन्हाळ्यात ताक प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. शरीरात पाण्याची कमतरता भरून निघते. अनेक लोक जेवणात ताक पितात. यामुळे जेवणाची मज्जा देखील द्विगुणित होते. तसेच ताक शरीरासाठी पौष्टिक असते. आपले पचन सुरळित ठेवण्यास मदत करते.