esakal | तांदळाची उकड
sakal

बोलून बातमी शोधा

food

तांदळाची उकड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-मानसी काणे

साहित्य : एक वाटी तांदळाची पिठी, दोन वाट्या ताक, फोडणीचे साहित्य, तूप, दोन चमचे शेंगदाणे, दोन चमचे डाळं, कोथिंबीर, ओले खोबरे, दोन हिरव्या मिरच्या, एक चमचा किसलेलं आलं.

कृती : प्रथम तूप गरम करून हिंग-जिऱ्याची फोडणी करावी. हिरव्या मिरचीचे तुकडे, आल्याचा कीस घालून थोडं परतावं व मग हळद घालावी. शेंगदाणे आणि डाळं या फोडणीत परतून घ्यावं. मग ताक घालून उकळी आणावी. त्यात तांदळाची पिठी हळूहळू घालावी. उलथन्याच्या टोकाने हलवावी. गुठळी होऊ देऊ नये. झाकण ठेवून चांगली वाफ आणावी. पुन्हा एकदा हलवून घ्यावे व आणखी एक वाफ आणावी. उकड थोडी चकचकीत दिसू लागली आणि खमंग वास आला, की चांगली शिजली असे समजावे. ही उकड खायला देताना वर भरपूर खोबरं, कोथिंबीर आणि साजूक तूप घालून गरम द्यावी.

loading image
go to top