Tandoori Dhokla Recipe: आता घरच्या घरी बनवा चवदार असा तंदूरी ढोकळा...

ढोकळा हा भारतातील गुजरात प्रांतांमधील एक शाकाहारी पदार्थ आहे.
tandoori dhokla
tandoori dhoklaEsakal

ढोकळा हा भारतातील गुजरात प्रांतांमधील एक शाकाहारी पदार्थ आहे. हा पदार्थ तांदूळ आणि चणाडाळीच्या आंबवलेल्या मिश्रणापासून बनवला जातो.ढोकळा सकाळी नाश्त्याच्या वेळेपासून अगदी जेवणाप्रमाणे सुद्धा खाल्ला जातो. ढोकळा हा खमण नावाने सुद्धा ओळखला जातो. दोन्ही नावे वापरली जातात.ढोकळा हा अतिशय आरोग्यदायी पदार्थ म्हणून ओळखला जातो. आजच्या लेखात आपण वेगळा आणि खास ढोकळा अशी तंदूरी ढोकळ्याची  रेसिपी पाहणार आहोत

साहित्य:

● एक कप बेसन

● हळद

● आले पेस्ट

● अर्धा कप दही  

● फ्रूट सॉल्ट

● मोहरी

● कढीपत्ता

● तेल

● मीठ

● लाल तिखट

● तंदुरी मसाला

tandoori dhokla
Winter Recipe: टेस्टी अन हेल्दी अननसाचा शिरा कसा तयार करायचा?

कृती:

बेसन, हळद, आले पेस्ट, दही, फ्रूट सॉल्ट, अर्धा चमचा तंदुरी मसाला, तिखट आणि चवीनुसार मीठ घाला. आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि घट्ट आणि गुळगुळीत बॅटर बनवा.गोल भांड्याला थोड्या तेलाने ग्रीस करून त्यात बॅटर घाला. स्टीमरमध्ये ठेवा, झाकून ठेवा आणि दहा ते बारा मिनिटे वाफ करा. झाल्यावर ते बाहेर काढून थंड होऊ द्या.तंदुरी ढोकळ्याचे चौकोनी तुकडे करून प्लेटमध्ये ठेवा. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कढीपत्ता, मोहरी टाका आणि एक मिनिट परतून घ्या. ढोकळ्याच्या चौकोनी तुकड्यांवर हे तडका घाला. शेवटी, वर अर्धा चमचा तंदुरी मसाला घाला. तडाक्यामध्ये दिड चमचा साखर अर्धा कप पाण्यात मिसळून तुम्ही गोड तडका बनवू शकता. उकळी येऊ द्या आणि नंतर ते ढोकळ्याच्या तुकड्यांवर घाला. तुमचा तंदुरी ढोकळा तयार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com