esakal | नागपूरी तर्री-पोहे
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूरी तर्री-पोहे

नागपूरी तर्री-पोहे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तर्री-पोहे हा नागपूरमधील फेमस पदार्थ. पोह्यांवर गावराणी चण्याच्या उसळीचा लाल तर्रीदार रस्सा घेऊन खाल्ला जातो. नागपूरमध्ये गल्लोगल्ली ठेल्यावर हे पोहे विकायला असतात.

तयार व्हायला लागणारा वेळ

१५ मि.

साहित्य

  • १०० ग्रॅम तयार पोहे

  • १०० ग्रॅम काळे चणे

  • १ कांदा

  • १ टमॉटो

  • २ टेस्पुन तेल

  • १ टीस्पून हिरवी मिरची लसूण पेस्ट

  • १ टीस्पून सावजी मसाला

  • १ टीस्पून तिखट

  • १/२ टीस्पून हळद

  • चवीनुसार मीठ

कृती

सर्वप्रथम पोहे करून घ्यायचे. फोडणीचे पोहे आपण कांदा किंवा बटाटा घालून करतो तसे.गावराणी चणे चार शिट्ट्या देऊन कुकरमध्ये उकडून घ्यावेत.

तेलात मिक्सर मधून काढून बारीक केलेला कांदा टोमॅटो लसूण टाका व हिरवी मिरचीची पेस्ट त्यानंतर सावजी मसाला, तिखट, तेल, हळद, मीठ घालून रस्सा तयार करावा. त्यात शिजलेले चणे घालावे. आता खायला देताना एका प्लेट मध्ये पोहे घ्यायचे आणि वरती तर्री टाकायची.

loading image
go to top