नुकतंच लग्न झालेल्यांनी 'हे' पदार्थ खाताना जरा सांभाळून|Diet After Marriage | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

couple
नुकतंच लग्न झालेल्यांनी 'हे' पदार्थ खाताना जरा सांभाळून|Diet After Marriage

नुकतंच लग्न झालेल्यांनी 'हे' पदार्थ खाताना जरा सांभाळून

डाएट आणि लाईफस्टाईलशी संबधित सवयींचा परिणाम तुमच्या लैंगिक जीवनावर (Sex Life) होऊ शकतो. जर तुमचे नवीनच लग्न (Marriage) झाले असेल किंवा होणार असेल तर काही पदार्थ खाण्यापासून दूरच राहा. हे पदार्थ खाल्याने तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा: तिशीच्या आत लग्न कराल तर फायद्यात राहाल, वाचा ५ फायदे

coffee

coffee

कॉफी (Coffee)

जास्त कॉफी प्यायल्याने पुरुषांमध्ये कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन तयार होतो. त्यात कॅफिन असते, ज्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते. परिणामी बायकोबरोबर शारीरिक संबंधांमध्ये अडचणी येऊ शकतात.

पुदिना (Mint)

श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी अनेकजण पुदीना खाताता. पण पुदिन्यात असलेल्या लैंगिक उत्तेजना कमी होते, त्यामुळे त्याचे सेवन टाळा.

हेही वाचा: सकाळी कॉफी प्या, डोळे चांगले ठेवा

cheese

cheese

चीज (Cheese)

चीजमध्ये खूप फॅट असते. ते खाल्ल्याने शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. त्यामुळे स्त्री-पुरुषांमध्ये इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन या सेक्स हार्मोन्सची निर्मिती थांबते. त्यामुळे साहजिकच लैंगिक जीवनावर परिणाम होऊ शकतो.

कॉर्नफ्लेक्स (Corn Flakes)

कॉर्नफ्लेक्स खाण्यानेही आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामळे तुमच्या लैंगिक आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

सोडा (Soda)

जर तुम्ही लग्नात खूप जेवल्यानंतर सोडा पित असाल तर सावधान. तुमच्या लैंगिक जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. सोडा तुमचे वजन आणि मूडवर वाईट परिणाम करतो. त्यामुळे तुमचे चांगले संबंध निर्माण होऊ शकत नाहीत,

हेही वाचा: ऑफिसमध्ये स्वत:ला सिद्ध करायचंय? 'या' पाच टिप्स फॉलो करून पहा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top