esakal | बदाम पासून घरीच तयार होणाऱ्या या रेसिपी नक्की ट्राय करा

बोलून बातमी शोधा

बदामपासून घरीच तयार होणाऱ्या रेसिपी नक्की ट्राय करा
बदामपासून घरीच तयार होणाऱ्या रेसिपी नक्की ट्राय करा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सुपर फूड म्हणून प्रसिद्ध असलेले बदाम साधारणतः सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असतात. याचा उपयोग त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी तसेच केसांचा मजबूतपणा टिकून ठेवण्यासाठी करतात. तुम्ही जर नेहमी बदाम खात असाल तर अनेक त्रास तुमच्यापासून दूर होऊ शकतात. ज्यादातर लोक बदाम पाण्यामध्ये भिजवून खाण्यास पसंती देतात किंवा दुधामध्ये मिक्स करून खातात. परंतु आम्ही आज तुम्हाला बदामपासून तयार होणाऱ्या काही रेसिपी सांगणार आहोत. ज्या रेसिपी सहजरित्या तुम्ही घरी नेहमीच बनवू शकता. आणि हे बनवणेही सोप आहे. चला तर मग त्या रेसिपी पाहूया..

बदाम तुळस सॉस -

साहित्य -

बादाम - 1 कप, तुळस पाने -1/2 कप, काळी मिरची -1/2 चमचे, मीठ - चवीनुसार, जैतूनचे तेल-1 चमचा, लसुण- 2 कळ्या, चीज - 2 चमचे, मोहरी-1/2 चमचे

कृती -

 • सर्वात आधी तुम्ही तुळशीची पाने, लसूण, बदाम मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्या.

 • दुसऱ्या बाजूला तुम्ही पॅनमध्ये तेल घालून त्यामध्ये काळी मिरची आणि मोहरी घालून गरम करून घ्या.

 • आता तुम्ही बनवलेली पेस्ट यामध्ये मिक्स करा आणि त्यामध्ये मीठ घालून थोडे वेळासाठी ते शिजवून घ्या.

 • दोन मिनिटानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. तुमची रेसिपी तयार आहे.

 • शक्य झाल्यास तुम्ही हे बंद डब्यामध्ये ठेवू शकता किंवा काही दिवसांसाठी वापरू शकता.

बदाम बिस्किटे -

साहित्य -

बादाम पाउडर -1/2 कप, बेकिंग पाउडर-1/2 चमचे, गहूचे पीठ -2 कप, साखरेची बारीक पाउडर-1/2 कप, लोणी - 1/3 कप, मीठ - आवश्यकतेनुसार, दूध-1 कप पर्याय

कृती -

 • प्रथमतः तुम्ही गहू पीठ बेकिंग पावडर मीठ आणि पाणी एकत्र करून मिश्रण तयार करा.

 • आता या तयार मिश्रणात बदाम पावडर, लोणी हे मिश्रण एकत्र करून घ्या.

 • आता हे मिश्रण काही वेळासाठी एका प्लेटमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून द्या.

 • मिश्रण थंड झाल्यानंतर याला बिस्किटांचा आकार द्या आणि त्यामध्ये वरून बदाम ठेवू शकता.

 • आता तुम्ही पंधरा ते वीस मिनिटांत ओव्हन सेट करून त्यामध्ये बिस्कीटे ठेवू शकता.

 • तुमची गरम-गरम बदाम कुकीज तयार आहेत.

बदाम खीर -

साहित्य -

बदाम- 2 कप, तूर-1 चमचा, दूध- 3 कप, साखर -1/3 कप, वेलदोडे पाउडर -1/2 चमचा

कृती -

 • सुरुवातीला तुम्ही काही वेळासाठी बदाम पाण्यामध्ये भिजवून एका बाजूला ठेवा.

 • त्यानंतर साधारण दहा मिनिटानंतर बदामला दुधामध्ये मिक्स करून मिक्सरला बारीक करून घ्या.

 • यानंतर एका पॅनमध्ये तूप गरम करून घ्या आणि हे तयार मिश्रण त्यामध्ये घालून शिजवून घ्या.

 • थोड्या वेळाने यामध्ये साखर, वेलदोडे पावडर आणि हलका ब्राऊन कलर येईपर्यंत शिजवून घ्या.

 • त्यानंतर गॅस बंद करा, एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि वरून ड्रायफ्रुट टाकून सजवू शकता. तुमची गोड खीर तयार आहे.