टोमॅटो खरेदी करण्याआधी लक्षात घ्या 'या' टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोमॅटो खरेदी करण्याआधी लक्षात घ्या 'या' टिप्स

टोमॅटो खरेदी करण्याआधी लक्षात घ्या 'या' टिप्स

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : टोमॅटो एक अशी भाजी आहे ज्याच्याशिवाय भारतीय जेवण अधूर आहे. टोमॅटो (tomato receipe) शिवाय भाजीमध्ये स्वाद राहत नाही. डाळीच्या आमटी असो की डाळ तडका टोमॅटो शिवाय टेस्टी होत नाही. टोमॅटोचे बाजारातील भाव (market rate) काही वेळा वाढतात. तरीही लोक त्याचा वापर करतात. याबाबतीत लोक थोडे सजग राहतात. परंतु टोमॅटो खात असताना त्यामध्ये उत्तम प्रतिचे टोमॅटो खरेदी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही बाजारातून योग्यप्रकारे टोमॅटो खरेदी करणार असाल, तर लोक त्याच्या लाल रंगावरून त्याला खरेदी करतात. परंतु फक्त लाल रंग म्हणजे उत्तम टोमॅटो असे होत नाही. टोमॅटो खरेदी (buy tomato) करतानाही अनेक गोष्टी लक्षात घेतल्या जातात त्या खालीलप्रमाणे..

टोमॅटो खरेदी करताना -

टोमॅटोला हलके दाबून पहा

जेव्हा तुम्ही टोमॅटो खरेदी करता तेव्हा त्या टोमॅटो खराब होत नाही. मात्र काही दिवसांसाठी ते स्टोअर (stor vegetable) करुन ठेवत असाल टोमॅटो हलकेच दाबून पहा. जर तो दाबला गेला तर त्याला खरेदी करू नका. असे टोमॅटो आतून खराब असतात. टोमॅटो हलका, पिवळा कलर किंवा लाल कलर मध्ये असेल तर तुम्ही त्याला खरेदी करू शकता. परंतु तो टणक असला पाहिजे. काहीवेळा पिवळ्या रंगाचा टोमॅटो आतून खराब असतो.

हिरवे टोमॅटो खरेदी शक्यतो टाळा

काहीवेळा तुम्ही भाजी खरेदीसाठी मार्केटला जाता. परंतु टोमॅटो मिळत नाही, यावेळी तुम्हाला हिरवे टोमॅटो मिळतात. परंतु तो अजून पिकलेला नसतो. काही पदार्थांमध्ये तुम्ही वापरला तर त्याची चव वेगळी लागते. शिवाय शिजण्यासाठीही थोडा वेळ लागेल. टोमॅटो हलका आणि लाल असेल तर त्याला खरेदी करू शकता. कारण हा काही वेळातच शिजतो आणि त्यामुळे पदार्थाची चव वाढते.

कोणता टॉमटो उत्तम असतो

आकाराने मोठे असणारे टोमॅटो खरेदी करून नका. असे टोमॅटो आर्टिफिशल फार्मिंगमध्ये तयार केलेले असतात. त्यामध्ये स्वादही नसतो. शिवाय हे आपल्या आरोग्यासाठीही फायद्याचे नसतात. त्यामुळे शक्यतो टोमॅटो खरेदी करताना आकाराने मोठे असलेले टोमॅटो घेणे टाळा.

loading image
go to top