esakal | पावसाळ्यात तांदळाला किड्यांपासून वाचवा, 'या' आहेत सोप्या टीप्स
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यात तांदळाला किड्यांपासून वाचवा, 'या' आहेत सोप्या टीप्स

पावसाळ्यात तांदळाला किड्यांपासून वाचवा, 'या' आहेत सोप्या टीप्स

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद - पावसाळ्यात ओलाव्यामुळे अन्नधान्याला किड लागते. हे किडे अन्नधान्याच्या पौष्टिकता कमी करुन त्यांची चव बिघडवतात. विशेषतः तांदुळात लागलेल्या किडीने पूर्ण तांदूळ खराब होते. यामुळे ओलाव्याने तांदूळ खूप लवकर खराब होतात. ती खाण्यालायक राहत नाहीत. धान्य आणि डाळी नेहमी हवाबंद डब्यात थंड आणि कोरड्या जागेत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण ओलावा आत जाऊ नये, ज्यामुळे किड्यांपासून त्यांचा संरक्षण होईल. मात्र बऱ्याचदा सगळी काळजी घेऊनही तांदळाला किडे लागून ती खराब होतात. अशा स्थितीत काही सोपे टीप्स लक्षात ठेवल्यास तांदळाला किडे लागणार नाहीत. ते जास्त काळ साठवून ठेवता येऊ शकते.

तेजपत्ता

तेजपत्ता

तेज पत्ता आणि कडूलिंबाच्या पानांचा वापर

तांदळाला किडीपासून बचावासाठी तिच्या डब्यात काही तेज पत्ते आणि कडुलिंबाचे वाळलेले पाने ठेवा. तेज पत्ता तांदळाला किड्यांपासून वाचवण्याची एक चांगली पद्धत आहे. कारण किड्यांना त्यांचा वास आवडत नाही. तसेच सुगंध उग्र असल्याने ती पळून जातात. कडुलिंबाचे पानामुळे किटकांचे अंड नष्ट करतात. तांदूळातून किडे पूर्णपणे निघून जातात. चांगल्या परिणामांसाठी तांदूळ हवाबंद डब्यात तेज पत्ते आणि कडूलिंबाचे पत्ते टाकून ठेवून द्या.

लवंग

लवंग

लवंगचा करा वापर

लवंगाच्या वासाने किडे दूर पळतात. हा चांगला उपाय आहे. जर तुम्हाला तांदळाला किड्यांपासून बचाव करायची असेल तर डब्यात १० ते १२ लवंग टाकून ठेवा. तांदळाच्या डब्यात किडे असतील ती निघून जातात. जर ती नसतील तांदळाचा त्यांच्यापासून बचाव होतो. तसेच तुम्ही डब्यात लवंगाच्या तेलाचे काही थेंब टाकू शकता.

फ्रिज

फ्रिज

तांदूळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा

जर तुम्ही काही प्रमाणात तांदूळ दुकानातून खरेदी केला असेल तर ती पावसाळ्यात किड्यांपासून वाचवण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे. तांदूळ घरी आणताच फ्रिजरमध्ये ठेवून दिल्यास त्यातील किडे आणि त्यांची अंडी थंड तापमानामुळे नष्ट होतात. तसेच पावसाळ्यात शक्यतो मोठ्या प्रमाणावर तांदूळ खरेदी करु नका.

लसणाच्या पाकळ्या

लसणाच्या पाकळ्या

लसणाच्या पाकळ्या

तांदळाला किड्यापासून वाचवण्यासाठी डब्यात लसणाच्या साधारण ५ ते ६ पाकळ्या टाकाव्यात आणि चांगल्याप्रकारे मिसळून टाका. जेव्हा या पाकळ्या वाळून जातील तेव्हा त्या काढून नवीन पाकळ्या टाकाव्यात. लसणाच्या उग्र वासामुळे तांदळाला किडीपासून संरक्षण मिळते.

आगपेटी

आगपेटी

तांदळाच्या डब्याजवळ आगपेटी ठेवा

आगपेटीत सल्फर असते. ते तांदूळ तसेच इतर धान्यातील किडे पळवण्यास मदत करते. तुम्ही कुठेही तांदूळ ठेवाल तेथे आगपेटीतील काडी ठेवा. त्यामुळे किडे पळून जातील.

तांदूळ उन्हात ठेवा

तांदूळ उन्हात ठेवा

तांदूळ उन्हात ठेवा

जर तांदळात सोनकिडे असतील तर तांदूळ काही वेळेसाठी उन्हात ठेवा. असे केल्याने किडे आणि त्याचे अंडी नष्ट होतात. जर तुम्हाला तांदळाला बरेच दिवस साठवायचे असेल तर ती जास्त वेळ उन्हात ठेवू नका.

loading image