चिरलेली कच्ची केळी आणि वांगी काळी पडतात तर याचा वापर जरूर करा

Tips to prevent brinjale and raw bananas from turning black.jpg
Tips to prevent brinjale and raw bananas from turning black.jpg
Updated on

पुणे : अनेकांना एक प्रश्न नेहमी पडत असतो कि, वांगी आणि केळी चिरल्यानंतर लगेच काळी का पडतात? प्रत्येकांच्या घरात कधी ना कधी वांग्यांची भाजी बनवलीच जाते. ही भाजी बनवताना सुरवातीला वांगी चिरावी लागते. थोड्या वेळातच ती काळी पडतात. केळीचं सुद्धा असच आहे. यासाठी, आपल्या घरात अशी एक गोष्ट आहे जी तिच्या वापरासह या समस्येवर सहज विजय मिळवू शकते. आज या लेखात आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब केल्यावर आपण भाज्या कापण्यासाठी काढलेली कच्ची केळी आणि वांगी सहजपणे काळा होण्यापासून वाचवू शकता.

लिंबाचा रस 

लिंबाचा रस कोणत्याही भाज्यांचा काळेपणा दूर करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. लिंबाचा रस भाजीचा काळेपणा दूर करते आणि भाजी ताजी ठेवते. यासाठी, एका भांड्यात पाणी आणि लिंबाचा रस मिक्स करा. हे द्रावण तयार झाल्यावर त्यात चिरलेली कच्ची केळी आणि वांगे घाला. एक ते दोन मिनिटांनंतर केळी आणि वांगे आपोआप काळेपणा दूर करतात. बरेच लोक या टिप्सचा वापर करून केळी आणि वांगी काळी पडू नये यासाठी टीप वापरतात.

व्हिनेगर वापरा

व्हिनेगरच्या सहाय्याने आपण केळी आणि वांग्याचे तुकडे केल्यामुळे ते काळे होण्यापासून वाचवू शकता. होय, यापैकी फक्त दोन ते तीन थेंब बस होईल. केळी आणि वांगी काळे होण्यापासून रोखण्यासाठी हे थेंब पुरेसे आहेत. यासाठी एका भांड्यात पाणी आणि व्हिनेगर एकत्र करून मिक्स करावे. जेव्हा जेव्हा तुम्ही भाजीसाठी केळी आणि वांगी कापता तेव्हा पाण्यात घाला. असे केल्याने कच्ची केळी आणि वांगी कापल्यानंतर काळे होतात, ते यापुढे कधीच होणार नाही. त्याचप्रमाणे व्हिनेगरचा वापर इतर भाज्यांना काळे होण्यापासून वाचतो. 

गोड सोडा वापरा

जसे बरेच लोक जेवण चवदार बनवण्यासाठी गोड सोडा वापरतात, त्याचप्रमाणे आपण भाजीसाठी कच्ची केळी आणि वांग्याचे काळेपण काढण्यासाठी गोड सोडा वापरू शकता. हे सुद्धा इतर टिप्सप्रमाणे पाण्यात टाकून तयार करा.हे तयार केल्यानंतर, जेव्हा तुम्ही भाजी कट कराल, नंतर या पाण्यात चिरलेली भाजी घाला. यामुळे भाजीचा काळपटपणा सहजपणे दूर होईल

काहीजण या टीप्सशिवाय चिरलेली कच्ची केळी आणि वांग्यांचा काळपट काढून टाकण्यासाठीही तुरटीचा वापर करतात. बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की अशा कामात तुरटीचा वापर करू नये. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com