नाचणीचे पीठ, पाणी आणि दूध एकत्र मिक्स करून घ्यावे. पीठ मिश्रणासाठी टाकताना त्यात गुठळ्या होणार नाहीत, अशी काळजी घ्यावी. हे सर्व मिश्रण मंद आचेवर शिजवावे. मिश्रण थोडे घट्टसर झाले की, त्यात गूळ आणि वेलची/जायफळ पूड घालावी. गूळ विरघळला की पातेले खाली उतरवावे. खीर गरमच सर्व्ह करावी. नंतर ती घट्ट येवू शकते. ही खीर पौष्टीक आणि पचायला हलकी असते.
साहित्य -
दीड टे. स्पून नाचणीचे पीठ, १/२ कप दूध, १/२ कप पाणी, २ टी स्पून गूळ (किंवा चवीनुसार), १/४ टी स्पून वेलची किंवा जायफळ पूड.
कृती -
नाचणीचे पीठ, पाणी आणि दूध एकत्र मिक्स करून घ्यावे. पीठ मिश्रणासाठी टाकताना त्यात गुठळ्या होणार नाहीत, अशी काळजी घ्यावी. हे सर्व मिश्रण मंद आचेवर शिजवावे. मिश्रण थोडे घट्टसर झाले की, त्यात गूळ आणि वेलची/जायफळ पूड घालावी. गूळ विरघळला की पातेले खाली उतरवावे. खीर गरमच सर्व्ह करावी. नंतर ती घट्ट येवू शकते. ही खीर पौष्टीक आणि पचायला हलकी असते.
टीप -
खीर बनवताना दूध आणि पाण्या यांच्याऐवजी फक्त दूधही वापरू शकतो. हीच खीर अधिक पौष्टीक होण्यासाठी काजू, बदाम, पिस्ते तसेच केसरही घालता येते. अर्थात, जर आवड असेल तर सुकामेवा वापरावा. अन्यथा, साधी खीर नाश्त्यासाठीही चांगला पर्याय ठरू शकते.
वेळ -
५ ते ७ मिनिटे
वाढणी -
१ ते २.