
साहित्य - १ कप चणा डाळ, १ कप किसलेला गूळ, एक कप मैदा, १/२ कप गव्हाचे पीठ, ७ ते ८ टे. स्पून तेल, १ टी स्पून वेलची पूड, तांदळाचे पीठ.
साहित्य - १ कप चणा डाळ, १ कप किसलेला गूळ, एक कप मैदा, १/२ कप गव्हाचे पीठ, ७ ते ८ टे. स्पून तेल, १ टी स्पून वेलची पूड, तांदळाचे पीठ.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कृती - १) कुकरमध्ये चणा डाळीच्या अडीचपट पाणी घालून चणा डाळ शिजवून घ्यावी. डाळ शिजली की, त्यातील पाणी निथळू द्यावे. हे पाणी वापरून कटाची आमटी करता येते.
२) डाळीतील पाणी निघून गेल्यावर ही डाळ पातेल्यात घ्यावी. त्यात किसलेला गूळ घालावा. मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. आटवताना ढवळत वरचेवर राहावे. जर ढवळायचे थांबवले तर मिश्रण पातेल्याला लागून करपू शकते. या पुरणात चमचाभर वेलची पूड घालावी.
३) मिश्रण घट्टसर झाले की, पातेले गॅसवरून उतरवावे. मिश्रण पुरण यंत्रातून फिरवून घ्यावे.
४) मैदा आणि कणिक एकत्रित करून त्यात ५-६ चमचे तेल घालावे आणि सैलसर मळून घ्यावे. भिजवलेले पीठ २ तास मुरू द्यावे.
५) पुरणाचे दीड इंचाचे गोळे बनवून घ्यावे. मैद्याचा अर्धा ते एक इंचाचा गोळा घ्यावा आणि त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा.
६) पोळपाटावर थोडी तांदळाची पिठी घेउन हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. तव्यावर खरपूस भाजून घ्यावी. साजूक तूप घालून गरम गरम सर्व्ह करावी. या पोळ्या टिकाऊ असतात. आठ एक दिवस सहज टिकतात. थंड पोळ्या दुधाबरोबर छान लागतात.